cbi officer arrested senior revenue department officer taking bribe crime pune sakal
पुणे

Bribe Crime : महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात

डॉ. अनिल रामोड यांच्या पुणे, नांदेड येथील घरांवर छापे, कोट्यवधींची रोकड जप्त केल्याची प्राथमिक माहिती

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड या उच्चपदस्थ अधिकाऱ्यास भू संपादनाच्या प्रकरणात लाच घेताना ताब्यात घेतले आहे. आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. एका आयएएस उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वकील तक्रारदाराने अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. रामोड यांनी माळशिरस येथील महामार्गालगतच्या भूसंपादन प्रकरणात लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानुसार सीबीआयने शुक्रवारी (ता. ९) सकाळी संबंधित वकिलाकडून आठ लाख रुपये घेताना डॉ. रामोड यांना ताब्यात घेतले.

या नोटांवरील बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत. डॉ. रामोड यांच्या नांदेड येथील घरीही सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे. सीबीआय अधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्त कार्यालयात रामोड यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. डॉ. रामोड यांचा २०२० मध्ये आयएएस केडरमध्ये समावेश झाला होता.

बाणेर येथील सदनिकेत मोठे घबाड?

बाणेर येथील ऋतुपर्ण सोसायटीत सी विंगमध्ये चौथ्या मजल्यावर डॉ. रामोड यांची सदनिका आहे. सीबीआयचे अधिकारी हे आज दुपारी दीडच्या सुमारास या सोसायटीत पोचले. त्यानंतर पुन्हा दहा मिनिटांनी दोन गाड्यांमधून अधिकारी-कर्मचारी दाखल झाले. त्यांनी या सदनिकेतचा ताबा घेतला. या सदनिकेत अधिकाऱ्यांना मोठे घबाड सापडल्याची चर्चा आहे. त्यासाठी नोटा मोजण्याच्या दोन मशिन मागविण्यात आल्या असून, पैशांची मोजदाद सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 4th T20I: श्रेयस अय्यरचा विश्वविक्रम, तर भुवीची जागा घेणाऱ्या मयंक यादवचे न्यूझीलंडला ५ ओव्हरमध्येच मोठे धक्के

Malegaon Commissioner ₹80000 Bribe Case : निवृत्तीला अवघे दोन दिवस उरले असताना मालेगाव महापालिकेचा आयुक्त एसीबीच्या जाळ्यात; 80 हजारांची लाच घेताना अटक

बापरे! तेजश्रीच्या पायाला गंभीर दुखापत? दीड महिन्यांपासून असलेलं फ्रॅक्चर दाखवत सांगितलं कारण

दुष्काळाचं सावट, रब्बी हंगामाची चिंता; शेतकऱ्यांसाठी महाबीजने आखलं ३.९८ लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्गावर २ हजार पोलिसांचा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT