cbi raid ias officer dr anil ganpatrao ramod cbi custody till 13 june crime pune sakal
पुणे

Pune News : आठ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी डॉ. अनिल रामोड यांना १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

डॉ. अनिल रामोड यांना १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी; विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भूसंपादनाच्या बदल्यात जादा परतावा देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआय न्यायालयाने १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला.

सीबीआयने तपासादरम्यान डॉ. रामोड यांच्या घर व कार्यालयातून ६ कोटी ६४ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. तसेच त्यांच्या कार्यालयात एक सीलबंद आयफोन जप्त करण्यात आला आहे. तक्रारदार व आरोपी यांमध्ये झालेले संभाषण रेकॉर्ड झाले आहे.

त्यामध्ये डॉ. रामोड यांनी पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहे. चौकशीसाठी डॉ. रामोड सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी डॉ. रामोड यांना पाच दिवस सीबीआय कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अभय अरीकर यांनी केला. सीबीआयचे अतिरिक्त अधिक्षक आय. बी. पेंढारी यांनी डॉ. रामोड यांना न्यायालयात हजर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT