varsha gaikwad 
पुणे

महाराष्ट्रातील बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्री घेणार निर्णय

सकाळ डिजिटल टीम

पुणे - सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यामुळे राज्यातल्या परीक्षांचे काय होणार असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्रात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे आधीच जाहीर केले आहे. परंतु सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुंबईत सचिव स्तरावर संपर्क साधला असता, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय होणार नाही. मात्र, शिक्षणमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली होती. आता सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाबाबत केंद्राने निर्णय जाहीर केला असला तरी राज्यातल्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाहीत. परीक्षा महत्त्वाच्या आहेत आणि त्या रद्द करून चालणार नाहीत. त्याच्या आधारेच पुढचे प्रवेश होतात अशी माहिती समजते.

राज्यातील एससी आणि एचएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानंतर केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या बैठकीनंतर सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय़ घेतला गेला. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली. बारावीच्या परीक्षा 4 मे रोजी सुरु होणार होत्या. आता या परीक्षा 14 जूननंतर होतील. तसंच 1 जूनला कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT