CCTV-Camera sakal
पुणे

CCTV Camera : बारामतीच्या सीसीटीव्ही कॅमे-याच्या प्रकल्पाला गती मिळणार

बारामती शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे.

मिलिंद संगई,

बारामती शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे.

बारामती - शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार या प्रकल्पाचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत.

शहरात घडणा-या विविध घटनांवर चोवीस तास नजर ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने या महत्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. यात काही फेरबदल पोलिस महासंचालक स्तरावर सुचविण्यात आल्यानंतर हा प्रकल्प रखडला होता. महाविकास आघाडीच्या काळात व्यापक प्रकल्प करण्याचा निर्णय झाला होता, प्रत्यक्षात तो कागदावरच राहिला.

प्रारंभी कमी कॅमे-याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. कालांतराने बारामती नगरपालिकेची हद्दवाढ झाली व अनेक ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी अधिक व्यापक प्रकल्पाची गरज पोलिस विभागाने बोलून दाखविल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा विस्तारीत करण्यात आला. प्रकल्प विस्तारला पण तो वेळेत मार्गी लागू शकला नाही.

नवीन प्रस्तावात 320 अत्याधुनिक कॅमे-यांच्या माध्यमातून शहरावर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मध्ये एकाच नियंत्रण कक्षात बसून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे. या मध्ये 200 कॅमेरे हे कायमस्वरुपी लावले जाणार असून उर्वरित 120 कॅमेरे हे फेस रेकनेसेशन प्रणालीचे असतील. या शिवाय या प्रकल्पात पँरारोमिक, पीटीझेड तसेच एएनपीआर व ड्रोन कॅमेरेही लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एखाद्या व्यक्तीचा स्पष्ट चेहरा दिसावा, नंबरप्लेट दिसून यावी असा प्रयत्न यात होणार आहे.

परदेशाच्या धर्तीवर ही प्रणाली विकसीत केली जाणार आहे. एखाद्या चौकात काही सूचना दयायच्या असतील तर त्या नियंत्रण कक्षात बसून पोलिस देऊ शकतील, शहरातील प्रत्येक वाहनावर व व्यक्तीवर नजर ठेवता येणार आहे. अनेकदा वाहनचोरी, भांडणे, चो-या या घटनात या कॅमे-यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

अनेक घटना घडल्यानंतर पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज तपासात मदत करते, मात्र बारामतीत सध्या पोलिसांना दुकानदारांच्या सीसीटीव्ही कॅमे-यांवरच अवलंबून राहावे लागत आहे, त्या मुळे हा प्रकल्प वेगाने मार्गी लागावा अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT