Bopdev accused cctv 
पुणे

Pune Crime: बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, संशयित आरोपींचे CCTV फुटेज समोर; पाहा VIDEO

Pune Bopdev ghat rape case: याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांनी दोन आरोपींचे स्केच जारी केले आहेत. सदर प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

कार्तिक पुजारी

Pune Crime: पुण्याच्या बोपदेव घाटामध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांनी दोन आरोपींचे स्केच जारी केले आहेत. सदर प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

सीसीटीव्हीमध्ये तीन संशयीत आरोपी दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, तीन व्यक्ती एका दुकानाबाहेर बाईकजवळ थांबले आहेत. ४ ऑक्टोबरच्या सकाळी १.३६ वाजताचा हा व्हिडिओ आहे. धक्कादायक घटना घडण्यापूर्वी काही तासांआधीचा हा व्हिडिओ आहे. ओरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.

त्या रात्री नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत बोपदेव घाटावर फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तीन व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी मित्राला त्याच्याच कपड्यांनी बांधले. त्यानंतर त्याला मारहाण देखील केली. त्यानंतर आळीपाळीने तिघांनी तरुणीवर बलात्कार केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींकडे कोयता आणि बांबूच्या काट्या होत्या. त्यांनी तरुणीचे सर्व दागिने काढून घेतले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. कोणाला याबाबत सांगितलं तर याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी त्यांनी दोघांना दिली. त्यानंतर ते त्या ठिकाणाहून पळून गेले.

आरोपींनी घटनास्थळ सोडल्यानंतर तरुणीने आधी आपल्या मित्राला सोडवले. त्यानंतर दोघे तरुणीच्या घरी गेले. तरुणी आपल्या बहिणीसोबत राहत होती. त्यानंतर ते कोथरुडमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. तेथील स्टाफने त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यासंदर्भातील माहिती सकाळी पाच वाजता पोलिसांना दिली.

पोलिसांनी याप्रकरणी पीडितेच्या मित्राच्या वर्णनावरून दोन आरोपींचे स्केच जारी केले आहेत. पोलिसांनी 8691999689, 8275200947, 9307545045 या तीन मोबाईल क्रमांकावर आरोपींची माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: ''गौरव मोरेसुद्धा घाबरलेला'', प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

Latest Maharashtra News Updates : 'प्रधानमंत्री धन-धनय कृषी योजने' ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्याबाबत रिट्विट केल्याप्रकरणी व्यापारी अटकेत

Kamika Ekadashi 2025: कधी आहे कामिका एकादशी? जाणून घ्या तारिख, तिथी आणि या दिवसाचे महत्त्व

Virat Kohli-Rohit Sharma: 'विराट-रोहितची कमी भासते, पण BCCI ची पॉलिसी आहे की...' उपाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT