पुणे

युवकांनी पहिल्यांदा मतदार बनण्याचा उत्सव साजरा करावा - पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

CD

नवमतदार बनण्याचा उत्सव साजरा करावा

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचे युवकांना आवाहन


सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २५ ः ‘‘जे युवक पहिल्यांदाच मतदार बनले आहेत, त्यांनी त्याचा उत्सव साजरा करावा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधत केले. देशात निवडणुका घेण्याच्या परंपरेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अशावेळी शाळा-महाविद्यालयांनी नव्या मतदारांचा सत्कार करावा, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.
‘माय भारत’ प्लॅटफॉर्मशी स्वतःला जोडत युवकांनी लोकशाही मजबूत करावी, असे आवाहनही मोदी यांनी या प्लॅटफॉर्मच्या सदस्यांना पत्र लिहीत केले आहे.
‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही प्रक्रियेने चालणारा देश आहे. भारत ही लोकशाहीची जननी असल्याचा आम्हाला गर्व आहे. लोकशाही, चर्चा आणि संवाद हे आमच्या संस्कृतीमध्ये वसलेले आहे. देशात १९५१ मध्ये सर्वसाधारण निवडणुकांना सुरुवात झाली होती. यावर्षी त्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. लोकशाहीची भावना भारतीय लोकांच्या स्वभावात भिनलेली आहे. लोकशाहीमध्ये मतदार होणे ही अधिकारासोबतच एक मोठी जबाबदारीही आहे,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

महिलांचा सहभाग महत्त्वाचा
मतदार करणे हा एक घटनात्मक अधिकार आहे, असे मोदी म्हणाले. ‘‘मतदार हा देशाचा भाग्यविधाता असतो. मतदानावेळी अंगठ्याला लावली जाणारी शाई ही लोकशाही जिवंत असल्याचे आणि त्याचा उद्देश खूप मोठा असल्याचे सांगते. सर्व समावेशक लोकशाहीसाठी महिला शक्ती आणि युवा महिलांची भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांची जागरूकता आणि सक्रिय सहभागाने लोकशाहीला मजबूत बनवले आहे,’’ असे मोदी म्हणाले. आजची युवा पिढी ‘आम्ही सकारात्मक कार्य करू शकतो’ या प्रेरणेने काम करते, एका मताचेही महत्त्व किती अधिक आहे ते इतरांना पटवून देऊ शकतात, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.


चौकट
आयोगाचे स्वातंत्र्य जपणे
ही जबाबदारी ः खर्गे
‘‘मागील काही काळापासून निवडणूक आयोगासारख्या संस्था मोठ्या दबावाखाली काम करीत आहेत. या संस्थांच्या स्वातंत्र्याची जबाबदारी आपली आहे,’’ असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि तिचा विकासही झाला पाहिजे, असे सांगत खर्गे म्हणाले की, स्वतंत्र, निष्पक्ष आणि निर्भय होऊन मतदान करणे हा मतदारांचा हक्क आहे. त्यासाठी शुद्ध मतदार यादी असणे आणि सर्वांना मतदानाचा समान अधिकार असणे गरजेचे आहे.

मतांची चोरी करत तसेच चुकीच्या पद्धतीने मतदार याद्यांची पडताळणी करीत लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. यामुळे देशाची जुनी लोकशाही परंपरा कमजोर होत आहे. आपणा सर्वांना निवडणूक आयोगाची इमानदारी वाचवावी लागेल, असेही खर्गे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT