rakasha bandhan
rakasha bandhan 
पुणे

पुस्तकाला राखी बांधून संतुलन संस्थेत रक्षाबंधन साजरे

सकाळवृत्तसेवा

पुणे -  कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विद्यार्थ्यांनी स्वतः सोबत आपल्या पुस्तकांची योग्य काळजी घेणेच, हेच यंदाचे खरे रक्षाबंधन, असा संदेश देत लहान मुलांनी  अनोख्या पध्दतीने  रक्षाबंधन साजरे केले.

रक्षाबंधनानिमित्त संतुलन संस्थेत राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात पुस्तकाला राखी बांधण्यात आली. "कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने कोरोनापासून सुरक्षित कसे राहता येईल, यासाठी काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वत:सोबत आपल्या पुस्तकाची आणि  शैक्षणिक साहित्याची काळजी घ्यावी, आजच्या परिस्थितीत हेच खरे रक्षाबंधन राहिल, "असे मत संतुलन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. बस्तू रेगे यांनी यावेळी व्यक्त केले.

संस्थेच्या संचालिका अ‍ॅड. पल्लवी रेगे, आदी मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते. अ‍ॅड. रेगे म्हणाले,"सरकार दफ्तरी नोंद नसलेल्या दगडखाण कामगारांच्या हक्कासाठी मागील २३ वर्षापासून संतुलन संस्था संघर्ष करत आहे. कामगारांना त्यांचे मुलभुत हक्क, सुरक्षा मिळावी, त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी संतुललने रस्त्यावरचा लढा आणि न्यायालयीन लढा देखील लढला आहे. त्यामुळे हजारो कामगार शोषण, अन्याय, अत्याचाराच्या भयान खाणीतून बाहेर पडले. आज खाणकामगारांच्या मुलांना शिक्षण मिळत आहे, येथील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत, हे संतुलनचे यश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कोरोना संरक्षक मास्क वाटप करण्यात आले. तसेच पुस्तकाला राखी बांधून त्याची सुरक्षा करण्याचा अभिनव संकल्प देखील करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदिनाथ चांदणे यांनी केले. तर आभार समाधान यादव यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT