shivneri
shivneri 
पुणे

शिवनेरीचा गणेशोत्सव आठवणीत राहील असा साजरा करा : संदीप पाटील

सकाळवृत्तसेवा

शिवनेरी - शिवजन्मभूमी शिवनेरीचा गणेशोत्सव आमच्या आठवणीत राहिला पाहिजे असे काहीतरी करून दाखवा असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याना केले. पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात गणेश मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते, शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्तिचे अध्यक्ष व नागरिक यांची बैठक झाली यावेळी ते बोलत होते

यावेळी नायब तहसीलदार वळवी, नगराध्यक्ष शाम पांडे, उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, आशा बुचके, बाजार समिती सभापती संजय काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, सर्व मंडळाच्या अध्यक्षांनी चांगले काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटविला पाहिजे. आपल्या गणेश मंडळास मार्गदर्शन करतील असे पाच शांतिदुत नेमावेत,पोलीस प्रशासनाकडून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. गणेश मंडळांनी आपल्या गावाचा व परिसराचा विकास करावा. जे कोणी डॉल्बी लावतील पुढील वर्षी त्या मंडळांना परवानगी मिळणार नाही. प्रत्येक मंडळांनी आपल्या वार्डात सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न करावा. नगरपालिका ट्रॅफिक वार्डनची जबाबदारी घेऊ शकते त्यांना आम्ही ड्रेस देऊ तुम्ही मानधन देऊ शकता. त्यामुळे ट्रॅफिक चा प्रश्न मिटू शकतो.गणपती मंडळात महिलांचा सहभाग वाढवा.

पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे म्हणाले, डॉल्बी व प्लास्टिक मुक्त उत्सव साजरा करा तसेच ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या. 
यावेळी तनिष्का व्यासपीठाच्या उज्वला शेवाळे, नगरसेवक फिरोज पठाण, भाऊ कुंभार, दिनेश दुबे,दीपक परदेशी, अलका फुलपगार, मधुकर काजळे, अकील शेख, देवराम लांडे, ज्ञानेश्वर काजळे, आदींनी सूचना मांडल्या.  

नगराध्यक्ष पांडे म्हणाले, मोकाट जनावरे, भटकी कुत्री, स्वच्छता व आरोग्य याबाबत प्रत्येक वर्षी नगरपालिका जबाबदारीने लक्ष देते. गणेशोत्सवातील सर्व कामे केली जातील. पोलिसांनी हस्तक्षेप करू नये यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःहून प्रयत्न करावेत. विलास कडलग यांनी सूत्रसंचलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT