shivneri.jpg
shivneri.jpg 
पुणे

'जय शिवाजी'च्या जयघोषाने दुमदुमली शिवजन्मभूमी

दत्ता म्हसकर

जुन्नर : किल्ले शिवनेरी (ता.जुन्नर) शिवजयंती निमित्ताने राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो शिवप्रेमीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषाने किल्ले शिवनेरीचा परिसर आज दुमदुमून गेला होता. भगवे फेटे, शर्ट घालून हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या शिवप्रेमीमुळे शिवरायांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी गड अवघा भगवामय झाला होता. शिवनेरीहून राज्याच्या विविध भागात शेकडो शिवज्योती मार्गस्थ झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज,बाल शिवाजी व जिजाऊंच्या वेशातील शिवभक्तांचे शिवप्रेमींना दर्शन होत होते.

शिवनेरीवर शिवजन्मस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालक मंत्री गिरीष बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार शरद सोनवणे, विनायक मेटे आदी मान्यवरांचे उपस्थितीत शिवजन्म सोहळा झाला. पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी पाळणा म्हटला नंतर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. पोलीस पथकाने पारंपरिक वाद्यवृदांत राष्ट्रगीत गायन केले. छत्रपती शिवरायांना बंदुकीच्या फैरीची सलामी देण्यात आली.

दरम्यान, सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा करण्यात आली. किल्ल्यावरील विविध वास्तुंना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. हातात भगवा झेंडा घेऊन 'जय जिजाऊ जय शिवराय','जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत शिवभक्त दिवसभर गडावर येत होते. शिवजन्मस्थानी आदिवासींच्या पारंपरिक गोफ लेझीमच्या खेळाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नरच्या पंचलिंग चौकातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्या जवळचा परिसर भगवे झेंडे व ढोल ताशांचे गजराने शिवमय झाला होता. शिवजयंतीसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांसाठी चार वाहनतळ करण्यात आले होते. ते सर्व सकाळीच वाहनांच्या गर्दीने भरले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT