wagholi
wagholi 
पुणे

डीजे वाजवून सण साजरा करणे म्हणजे हुल्लडबाजी - संदीप पाटील

निलेश कांकरिया

वाघोली -  आर्थिक सुबत्ता असली तरी वैचारिक सुबत्ता महत्वाची आहे. गणेशोत्सव हा सामाजिक बांधिलकीचा सण आहे. डीजे. वाजवून सण साजरा करणे म्हणजे हुल्लडबाजी आहे. ती हुल्लडबाजी न करता सामाजिक बांधिलकी जपा. असे मत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या गणराया पारितोषिक वितरण व गणेशोत्सव मंडळ बैठकीत ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, जग आपली संस्कृती मान्य करते मग ही डी जे संस्कृती आली कोठून. डी जे लावूंन त्यावर बीभत्स नाचण्यापेक्षा पारंपरिक वाद्य वाजवून त्याचा आनंद लुटा. वाघोलित वाहतूक नियंत्रणासाठी ट्राफिक वॉर्डन, कॅमेरे व अन्य यंत्रणेची गरज आहे. त्याच्या आर्थिक मदतीसाठी मंडळांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. पुण्यासारख्या सांस्कृतिक, शैक्षणिक शहरात डी जे बाबत गुन्हा दाखल झाला तर ती शर्मात्मक बाब असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गणराया परितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच डॉल्बी न लावणाऱ्या व महिलांना मंडळात स्थान देणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ मिलिंद भोई, हवेली उपविभागीय अधिकारी सुहास गरुड, सरपंच वसुंधरा उबाळे, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील उपस्तीत होते.           

पारितोषिक मिळालेल्या मंडळांची नावे पुढीलप्रमाणे -
शहरी विभाग -- 
प्रथम क्रमांक -- शिवशक्ती तरुण मंडळ, बाजार तळ, वाघोली
‎द्वितीय क्रमांक --  जयभवानी मित्र मंडळ, गाडे वस्ती, वाघोली
तृतीय क्रमांक -- भैरवनाथ मित्र मंडळ, उबाळे नगर, वाघोली

ग्रामीण विभाग -- 
प्रथम क्रमांक -- जयहिंद तरुण मंडळ, फुलगाव
द्वितीय क्रमांक --चिंतामणी मित्र मंडळ, मांजरी खुर्द
तृतीय क्रमांक -- आदर्श तरुण मंडळ, डोंगरगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT