पुणे

आंबेगाव तालुक्यात जनगणना मोहिम सुरू

CD

मंचर, ता. १९ : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ मोहिमेला आंबेगाव तालुक्यात सुरुवात झाली आहे. या मोहिमेला नागरिकांनी सक्रिय प्रतिसाद देऊन योग्य व सत्य माहिती द्यावी, असे आवाहन आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी केले आहे. जनगणना प्रक्रिये दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी. नागरिकांकडून संकलित करण्यात येणारी सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मोहिमेअंतर्गत घरगणना आणि घर यादी प्रक्रियेद्वारे प्रत्येक घर व व्यक्तीची अचूक माहिती संकलित केली जाणार आहे. संकलित माहितीच्या आधारे शासनाच्या विविध विकास योजना आणि लोककल्याणकारी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचेही सांगण्यात आले. नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करून मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीस हातभार लावावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CRPF Constable Recruitment 2026 Last Date : कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख, ९१९५ सरकारी नोकऱ्यांसाठी असा करा अर्ज

Nagpur News: एनएचएआयकडून वीज वाहिनीचे नुकसान ;२२ हजार नागरिक उकाड्याने त्रस्‍त

Krishnaraj Mahadik Statement : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांची दिशाभूल; भाजप प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांचा राजू शेट्टी, सतेज पाटलांवर निशाणा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

अर्रर्रर्र खतरनाक! 'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; गोपाळला वठणीवर आणायला 'ती' येतेय; कोण आहे ती? नेटकऱ्यांनी ओळखलं...

SCROLL FOR NEXT