vaccine vaccine
पुणे

पुण्यात लशींअभावी आज केंद्र बंद

शासनाकडून लसपुरवठा नाही; नागरिकांनी गर्दी करू नये

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात मंगळवारी १३ हजार ३९९ जणांना लस देण्यात आली. शासनाकडून महापालिकेला मिळालेल्या ३८ हजार लशींपैकी बहुतांश लस संपल्या आहेत. अनेक केंद्रांवर आज एकही लस शिल्लक नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसह इतरांनी लस घेण्यासाठी बुधवारी (ता. २८) केंद्रावर न गेलेलेच बरे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लस उपलब्ध झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू असून, आत्तापर्यंत आठ लाख ८ हजार ४८४ जणांचे लसीकरण झालेले आहे. रविवारी शासनाकडून ३८ हजार डोस उपलब्ध झाले. सोमवारी २४ हजार ७०२ जणांचे लसीकरण झाले, तर मंगळवारी १३ हजार ३९९ जणांना लस दिली. त्यामुळे हा साठा जवळपास संपला आहे.

मागणीपेक्षा कमी लस मिळत असल्याने लसीकरण केंद्रांवर केवळ ५० ते १०० जणांचे लसीकरण होत आहे. महापालिकेच्या अनेक केंद्रांवरील लस सोमवारीच संपल्याने मंगळवारी अनेक केंद्रांना टाळेच होते. तसेच काही ठिकाणी नागरिक दोन-तीन तास रांगेत थांबूनही लस उपलब्ध झाली नसल्याने घरी परतावे लागले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, ‘‘शासनाकडून ज्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे, तशी सर्व केंद्रांवर दिली जात आहे. रात्री उशिरापर्यंत लस उपलब्ध झाली नाही तर ‘लस संपल्याने केंद्र बंद आहे’, असे बोर्ड लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नगरसेविका मंजूषा नागपुरे म्हणाल्या, ‘‘आरोग्य विभागाने लस उपलब्ध होणार आहे की नाही, हे आदल्या दिवशी स्पष्ट करणे गरजेचे आहे. याची माहिती कोणालाही नसल्याने सिंहगड रस्ता भागातील केंद्रांवर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामधूनच संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यात वेळीच सुधारणा करावी.’’

आजपासून नोंदणी सुरू

केंद्र सरकारने १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांना १ मे पासून लस देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, अशांनाच लस दिली जाणार आहे. ही नोंदणी कोवीन ॲपवर करणे गरजेचे असून त्यांची नोंदणी २८ एप्रिलपासून सुरू होत आहे.

मंगळवारी झालेले लसीकरण

गट - पहिला डोसा - दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी -१०४ - ३५२

फ्रंटलाइन कर्मचारी - ८५० - ४३८

ज्येष्ठ नागरिक - १३६७ - ५३२२

४५ ते ५९ वयोगट - ३२३६ - १७३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Pune News : प्रभाग रचनेवर संताप; पुण्यात नागरिकांचा घोषणाबाजीचा धडाका

Neelam Gorhe : शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी होण्याचे आवाहन

Pune News : पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहे महिलांसाठी खुली करण्याची मागणी

OBC Reservation : "ओबीसींचं आरक्षणच संपलं" घोषणा देत तरूणाने जीवन संपवले

SCROLL FOR NEXT