Shetkari Aakrosh Morcha sakal
पुणे

Pune News : केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने 'शेतकरी आक्रोश मोर्चा - खासदार डॉ. अमोल कोल्हे

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात २७ ते ३० डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने 'शेतकरी आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार.

रवींद्र पाटे

नारायणगाव - लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात २७ ते ३० डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने 'शेतकरी आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे.

मोर्चाचा शुभारंभ २७ डिसेंबर रोजी किल्ले शिवनेरी येथून (जुन्नर) होणार असून सांगता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे सभा घेऊन होणार आहे. अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले कांद्यावरील निर्यात बंदी, दूधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे व मी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी केली असता आम्हाला निलंबित करण्यात आले. त्यामुळे आता ही लढाई महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकरी आक्रोश मोर्चा'चे रणशिंग फुंकले आहे.

शेतकरी आक्रोश मोर्चा'चा प्रारंभ २७ डिसेंबर रोजी किल्ले शिवनेरी (जुन्नर) येथे होणार असून ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण (मशाल मोर्चा), केंदूर असा होणार आहे. केंदूर येथे पहिला मुक्काम होणार असून चाकण येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

२८ डिसेंबर रोजी शेतकरी आक्रोश मोर्चा केंदूर येथून शिक्रापूर, न्हावरा, मांडवगण, निर्वि मार्गे दौंड येथे मुक्कामी जाईल. २९ डिसेंबर रोजी दौंड येथून इंदापूर मार्गे बारामती येथे जाणार असून, बारामती शहरात मशाल मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला जाईल.

अखेरच्या दिवशी ३० डिसेंबर रोजी बारामती येथून उरळीकांचन, कुंजीरवाडी, हडपसर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दुपारी ३.०० वाजता सांगता सभा होणार आहे. या सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT