पुणे

केंद्र सरकारचा आदेश : ग्राम विकास आराखडे बदलावे लागणार 

गजेंद्र बडे - सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाचा पन्नास टक्के निधी हा फक्त पिण्याचे पाणी, पावसाचे पाणी संकलन, स्वच्छता व हागणदारीमुक्त गावांचा दर्जा कायम राखण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. यामुळे ग्रामपंचायतींना आता आपापल्या गावांचे चालू आर्थिक वर्षाचे गाव विकास कृती आराखडे बदलावे लागणार आहेत. 

दरम्यान, हे आराखडे सुधारित करून नव्याने ते प्लॅन प्लस या प्रणालीत अपलोड करावे लागणार आहेत. अपलोड करण्यापुर्वी या सुधारित आराखड्यांना पहिल्यांदा ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत आणि त्यानंतर ग्रामसभेत मंजुरी घ्यावी लागणार आहे. यासाठी ३१ मे ही अंतिम मुदत (डेडलाईन) देण्यात आली आहे. 

वितरण आयोगामार्फत केंद्र सरकारकडून गावांच्या विकासासाठी निधी दिला जातो. त्यानुसार दर पाच वर्षांनी नवा आयोग स्थापन केला जातो आणि या आयोगाच्या शिफारशीनुसार गावांना निधी दिला जातो. यासाठी पहिल्यांदा गावनिहाय गाव विकासाचा पंचवार्षिक कृती आराखडा आणि त्यानंतर दरवर्षी आर्थिक वर्षनिहाय विकास आराखडा तयार करून त्यास ग्रामपंचायतींच्या सभेत आणि ग्रामसभेत मंजुरी घ्यावी लागते. यानुसार हे आराखडे आधीच ग्रामसभांमध्ये मंजूर झालेले आहेत. परंतु केंद्र सरकारच्या या नव्या आदेशामुळे सुधारित आराखड्यांसाठी ही प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सुधारित आराखड्यात स्वच्छता व पाणीविषयक कामांसाठी निर्माण निधी गृहित धरुन संभाव्य प्राप्त निधीच्या सव्वा ते दीडपट कामांचे नियोजन करावे लागणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाची मुदत ३१ मार्च २०२० ला संपली आहे. १ एप्रिल २०२० पासून पंधराव्या वित्त आयोगाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 

राज्यातील पंचायतराज संस्था 
- जिल्हा परिषदा --- ३४. 
- पंचायत समित्या ---- ३५४. 
- ग्रामपंचायतींची संख्या --- २७ हजार ९०८. 
- पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्या --- १३. 
- जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती --- एक हजार ४०७. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT