Indian_Army_Soldier
Indian_Army_Soldier 
पुणे

जवानांना निरोप देताना 'त्यांच्या' अश्रूंचा बांध फुटला; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला भावनिक व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा

खडकी (पुणे) : केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला असून तो पाहताना तुम्ही नक्कीच भावनिक होऊन जाल. पुण्यातील खडकी रेल्वे स्टेशनवर आर्मीच्या जवानांना निरोप देण्यासाठी त्यांचा परिवार देखील आला होता. त्यामुळे खडकी रेल्वे स्टेशनवरील वातावरण काही वेळासाठी खूप इमोशनल झालं होतं. 

रेल्वेमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, ''पुण्यातील खडकी रेल्वे स्टेशनवर हा व्हिडिओ टिपण्यात आला आहे. आपल्या परिवारापासून दूर राहून देशाची सेवा आणि सुरक्षा करण्यासाठी जाणाऱ्या वीर जवानांचा आणि त्यांच्या परिवाराचा भावूक आणि गौरवान्वित असा हा क्षण.''

व्हिडिओमध्ये जवान आपल्या परिवारातील लोकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. निरोप घेतानाचं हे दृश्य भावनांनी खूप ओतप्रोत करणारं आहे. जवान जेव्हा रेल्वेमध्ये चढतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. या व्हिडिओला 'कर्मा' (१९८६) या हिंदी चित्रपटातील सदाबहार आणि देशभक्तीवरील 'दिल दिया है, जान भी देंगे... ए वतन तेरे लिए' हे गाणे जोडले असल्याने हा व्हिडिओ पाहताना आपले डोळे कधी ओले झाले, याची कल्पनाही येत नाही. 

रेल्वेमंत्री गोयल यांनी हा व्हिडिओ १९ जुलै रोजी शेअर केला आहे. आतापर्यंत साडे पाच लाखाहून अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असून ४६ हजाराहून अधिकांनी त्याला पसंती दर्शविली आहे. तर साडेसहा हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी ते रिट्विट केले आहे. एका नेटकऱ्याने लिहले आहे की, 'या आपल्या बहादूर जवानांमुळेच आपण आपल्या घरी शांतपणे झोपत आहोत. त्यांचे धन्यवाद मानायला कोणतेही शब्द अपुरे पडतील.'

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT