aayush Prasad and Vijaykumar Parit sakal
पुणे

Blood Pressure : सीईओंनी तपासला बीडीओंचा रक्तदाब

इंदापूरात कामाचा खूप ताण असल्याचे वारंवार सांगत असल्याने बीडीओसाहेब तुमचाच बीपी (रक्तदाब) तपासूयात असे म्हटल्यानंतर, त्यांनीही हात पुढे करत रक्तदाब तपासणीचा पट्टा दंडावर बांधला.

सचिन लोंढे

इंदापूरात कामाचा खूप ताण असल्याचे वारंवार सांगत असल्याने बीडीओसाहेब तुमचाच बीपी (रक्तदाब) तपासूयात असे म्हटल्यानंतर, त्यांनीही हात पुढे करत रक्तदाब तपासणीचा पट्टा दंडावर बांधला.

पळसदेव - इंदापूरात कामाचा खूप ताण असल्याचे वारंवार सांगत असल्याने बीडीओसाहेब तुमचाच बीपी (रक्तदाब) तपासूयात असे म्हटल्यानंतर, त्यांनीही हात पुढे करत रक्तदाब तपासणीचा पट्टा दंडावर बांधला. रक्तदाब सामान्य असल्याचे दिसून आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तुम्हाला कुठे त्रास आहे, बीपी तर सामान्य आहे असे म्हणताच, साहेब तुम्ही आल्याने ताण कमी झाल्याचे हजर जबाबी स्पष्टीकरण गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिले. यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पळसदेव (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देवून येथील कामकाजाची माहिती घेतली. जिल्हा परिषदेकडून दिल्या गेलेल्या साहित्याची, औषधांची व रुग्णांना मिळणाऱ्या सेवांची माहिती घेतली. यावेळी येथील बालमृत्युची संख्या पाहून सीईओंना आश्चर्याचा धक्का बसला. तालुक्यात १३ बालमृत्यु झालेले असताना यापैकी केवळ या आरोग्य केंद्रातंर्गत ८ बालमृत्यु झाल्याने त्यांनी पुढील काळात काळजी घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान साहित्याची पाहणी करताना टेबलवरील रक्तदाब तपासणी यंत्राच्या साह्याने त्यांनी गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांचा रक्तदाब तपासला.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या या आरोग्य केंद्राची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळे, कृषी अधिकारी राजेंद्र काळे, उपसरपंच कैलास भोसले, विशाल बनसुडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सुरवातीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेने दिलेल्या साहित्याची पाहणी करत त्याची रजिस्टरला नोंद आहे काय याची माहिती घेतली. नंतर औषधांची माहिती घेतली. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मॉक ड्रिल करण्याची सूचना केली. अग्निशामक यंत्राचा वापर शिकण्याचा सल्ला दिला. आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या १११ सेवा पुरविण्यासाठी केंद्रातंर्गत प्रयत्नाबरोबर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याबाबत सूचना केली. कुटुंब नियोजन, बाल रोग तपासणी, गर्भवती माता तपासणी यांसारख्या योजनांना प्राधान्य देण्याबरोबर आरोग्य केंद्रासाठी चार कोटींहून अधिक निधी दिला जाणार असल्याने आरोग्य केंद्राची इमारत देखणी करण्याचा आदेश त्यांनी दिला. दरम्यान बालमृत्युची संख्या विचारात घेवून, यामध्ये हयगय होवू न देण्याची तंबी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा बंगेरा, डॉ. प्रिती रेड्डी यांनी प्रसाद यांचा सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT