Cyber  
पुणे

Pune Crime : 'सीईओ स्कॅम’ बनतेय डोकेदुखी! संवेदनशील माहितीची चोरून नातेवाईकांकडे होते पैशांची मागणी

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपण एखाद्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) किंवा उच्च पदावर कार्यरत आहात... तर डिजिटल जगात सुरक्षित आहात, याची खात्री राहिलेली नाही... सायबर गुन्हेगार हे तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशांवर डल्ला मारत आहेत.

उच्चपदस्थ व्यक्ती आणि व्यावसायिकांचे इ-मेल, फेसबुक हॅक करून संवेदनशील माहिती घेतली जाते. तसेच, नातेवाईक, मित्रांकडे परस्पर पैशांची मागणी करण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. त्यामुळे ‘सीईओ स्कॅम’ ही उच्चपदस्थ व्यक्ती आणि व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

नेमका काय आहे ‘सीईओ स्कॅम’ ?

एखाद्या कंपनीच्या सीईओ किंवा उच्च पदावरील व्यक्तीचा इ-मेल किंवा फेसबुक हॅक करून बनावट अकाउंटद्वारे जवळच्या मित्र, नातेवाइकांना व्हॉटसॲपवर संदेश पाठविला जातो. ‘महत्त्वाच्या कामासाठी निधी किंवा कंपनीचा संवेदनशील डेटा शेअर करण्याबाबत सांगितले जाते. कृपया तुम्हाला माझा मजकूर मिळताच माझ्याकडे परत या.

धन्यवाद.’ ‘बॉस’कडून आलेला हा संदेश खरा असल्याचे भासवले जाते. तसेच, ‘पैशांची अत्यंत गरज आहे’, असे सांगून पैसे मागितले जातात. विशेष म्हणजे काहीजण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सीईओचा हुबेहूब आवाज वापरत आहेत. त्यामुळे तो आवाज खरा की बनावट हेही सांगणे अशक्य होते.

‘सीईओ स्कॅम’ पासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल

- पैसे, संवेदनशील माहिती किंवा अनपेक्षित मागणीचा संदेश किंवा फोन आल्यास त्याची खात्री करावी.

- घोटाळेबाज व्यक्तींकडून भावनिक आवाहन करून पैशांची मागणी केली जाते. अशा वेळी घाई न करता माहिती तपासून घ्यावी.

- नवीन सायबर घोटाळ्यांबाबत माहिती घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवावे.

- टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरल्यास स्कॅमरना पासवर्ड मिळाला तरी हॅक करणे कठीण होते.

- वैयक्तिक, कौटुंबिक फोटो किंवा आर्थिक माहिती ईमेल किंवा व्हॉट्सअॅपवर कधीही शेअर करू नये.

- फेसबुक प्रोफाइल लॉक ठेवणे कधीही उत्तम

- एखाद्याने लक्ष्य केल्याचा संशय आल्यास सायबर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.

- डिजिटल जगात सतर्क राहिल्यास सुरक्षित आणि आत्मविश्वासाने प्रगती करणे शक्य.

सायबर फसवणुकीच्या घटना- वर्ष २०२२ :

सायबर फसवणूक प्रकार - तक्रारी दाखल

इ-मेल हॅकिंग, बनावट इ-मेल - १३०

फेसबुक, व्हॉटसॲप हॅकिंग - ९९

वर्ष २०२३, २७ जूनअखेर

इ-मेल, फेसबुक, व्हॉटसॲप हॅकिंग - १०

फेसबुक हॅक झाल्यास तातडीने प्रोफाइल लॉक करा. फेसबुकवर किंवा व्हॉटसअप मेसेज करून पैशांची मागणी केल्यास देवू नयेत. अशा वेळी नागरिकांनी संबंधित व्यक्तीशी बोलून प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी. फेसबुक, इ-मेल हॅक झाल्यास सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करावी. सायबर पोलिसांकडून ती तक्रार फेसबुककडे पाठवली जाते. त्याची फेसबुकमार्फत पडताळणी करून ते अकाउंट बंद केले जाते.

- मीनल सुपे-पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT