पुणे

विंग. विंग केंद्रांतर्गत 14 शाळांचा बाल आनंद मेळावा उत्साहात

CD

चचेगावात विद्यार्थ्यांकडून कलाविष्कार

बालआनंद मेळाव्यात १४ शाळांचा सहभाग; सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहात

विंग, ता. १४ ः चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद शाळेत विंग केंद्रांतर्गत १४ शाळांचा बाल आनंद मेळावा उत्साहात झाला. मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर करून मने जिंकली. जुन्या हिंदी मराठी गीतावर नृत्याविष्कार सादर करून वाहवा मिळवली. उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
जिल्हा परिषद सदस्या शैलजा शिंदे व पंचायत समिती सदस्या सुनंदा पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटनाने मेळाव्याला प्रारंभ झाला. कऱ्हाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, शिक्षण विस्ताराधिकारी जमिला मुलाणी, केंद्रप्रमुख सर्जेराव केंजळे, केंद्रसंचालक तानाजी पाटील शिक्षण विस्ताराधिकारी सूर्यकांत बाजारे, चचेगाव उपसरपंच तानाजी थोरात, सदस्य युवराज पाटील, रयतचे संचालक अर्जुन पवार, एसएमसी अध्यक्ष दीपक पवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अस्मन पठाण, विंगचे विकास देशमुख चचेगाव शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता यादव, विंग केंद्रांतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
विविध फनिगेम्स आयोजित करण्यात आल्या होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व बक्षीस वितरणाने मेळाव्याची सांगता झाली. अलका ढवळे, उमेश सागरे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम कारंडे यांनी आभार मानले.

-----------------------------------------

02227
चचेगाव : बालआनंद मेळाव्याच्या उद्‍घाटनप्रसंगी शैलजा शिंदे, सुनंदा पाटील, बिपिन मोरे, अर्जुन पवार, सर्जेराव केंजळे, मीनाक्षी गायकवाड, तानाजी पाटील, सुनीता यादव, संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक.
---------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT