पुणे

चाफ्याची फुले कवितासंग्रहाचे प्रकाशन

CD

‘चाफ्याची फुले’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

साताऱ्यात कार्यक्रम; विश्र्वजित जाधवांकडून कविता वाचन

​सातारा, ता. २० ः भावनिक सुगंध असणारी चाफ्याची फुले या कवितासंग्रहातील कविता संग्रह निसर्ग, माती, नाती आणि ग्रामसंस्कृतीशी नाळ जोडणारा आहे. यातील अनेक कविता जिव्हाळा जपतात आणि अनेकांच्या जगण्याशी साम्यस्थळे जोडतात, असे प्रतिपादन कवी चंद्रकांत कांबिरे यांनी केले.
​छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कवी विश्वजित जाधव यांच्या ‘चाफ्याची फुले’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. अशोक शेलार यांनी काव्यसंग्रहातील कवितांची वैशिष्ट्ये आणि भाषिक सौंदर्य सांगून कवितांचे वाचन केले. कवी जाधव यांनी मनोगत केले.
मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. सविता कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक जीवन दणाणे यांनी आभार मानले. या सोहळ्यासाठी प्रा. वैशाली जाधव, कवयित्री मनीषा शिरटावले, प्रा. संध्या लांडगे, डॉ. विद्या नावडकर, प्रा. राहुल गंगावणे, प्रा. रमेश मस्के, माजी मुख्याध्यापक शिवाजी भोसले, शिवाजी राऊत आदी उपस्थित होते.

W20341
सातारा ः चंद्रकांत कांबिरे, डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. अशोक शेलार, प्रा. विश्वजित जाधव, प्रा. वैशाली जाधव, सविता कारंजकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivraj Motegaonkar Viral Video : पेपर फोडणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्या... शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल

‘जशी स्वामींची इच्छा!’ गश्मीर महाजनी देऊळ बंद 2 मध्ये दिसणार? मोहन जोशी म्हणाले...'सगळे राघव शास्त्रीबद्दल...'

LSG vs RR: ३८ चेंडूत ९३ धावा... वैभव सूर्यवंशीने वादळी खेळीसोबतच ३ मोठे विक्रमही केले; रिषभचा ८ वर्षे जुना रेकॉर्डही मोडला

Swimming Record: शेतकरी कुटुंबातील कन्येची भरारी! आंबेगावची १३ वर्षीय विधी भोरची ऐतिहासिक कामगिरी; ४२ किमी जलतरण ७ तासांत पूर्ण..

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

SCROLL FOR NEXT