पुणे

सौरभ बोथरा यांची दोन दिवस ‘चेअर योगा’ प्रात्यक्षिके आणि कार्यशाळा ; प्रवेश विनामूल्य

CD

पुणे, ता. १८ ः शरीरासोबत मनाचेही आरोग्य जपणारा, संपूर्ण आरोग्यासाठी व आयुष्याच्या संतुलित प्रवासासाठी सर्वाधिक उपयुक्त व मार्गदर्शक ठरलेल्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम’ या बहुचर्चित उपक्रमाच्या पाचव्या पर्वात योगतज्ज्ञ सौरभ बोथरा हे ‘योग म्हणजे शरीराची तंदुरुस्ती नव्हे, तर मन, आत्मा आणि जीवनाचा संतुलित प्रवास’, याविषयी ‘चेअर योगा’ च्या प्रात्यक्षिकांद्वारे प्रत्यक्ष स्वतः दोन दिवस मार्गदर्शन कार्यशाळा घेणार आहेत.
‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम’ या लोकप्रिय उपक्रमाचे पाचवे पर्व ४ ते ६ डिसेंबरदरम्यान होणार असून, पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे हा तीन दिवसीय आरोग्य महोत्सव रंगणार आहे.
आरोग्य आणि फिटनेसचे प्रख्यात व्याख्याते आणि सर्वात मोठा व्हर्च्युअल योग वेलनेस प्लॅटफॉर्म ‘हॅबिल्ड’ चे सीईओ, ३१ वर्षीय योगतज्ज्ञ सौरभ बोथरा हे केंद्र सरकारद्वारे प्रमाणित योग प्रशिक्षक आहेत. बोथरा यांचा ‘चेअर योगा’ हा प्रामुख्याने ज्या व्यक्तींना जमिनीवर बसून योगासने करणे शक्य नाही किंवा माहिती तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक कामानिमित्त कार्यालयांमध्ये सलग एकाच जागी बसून काम करतात, अशा व्यक्तींसाठी तयार केलेला एक साधा - सोपा आणि सुरक्षित व्यायाम प्रकार आहे.
‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम’ उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’ व को - पॉवर्ड बाय प्रायोजक विश्वकर्मा विद्यापीठ आहेत. याशिवाय मे बी. जी. चितळे डेअरी, केसरी टूर्स आणि कॉटनकिंग हे सहयोगी प्रायोजक असून, इलेक्ट्रॉनिक्स पार्टनर विजय सेल्स आणि ज्वेलरी पार्टनर कल्याण ज्वेलर्स आहेत. ‘स्वास्थ्यम’ मध्ये गेल्या वर्षी सुमारे २५ हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. यंदाच्या पर्वात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक संवाद साधणार आहेत.
-----------------------------

‘चेअर योगा’ची वैशिष्ट्ये
- साधा आणि सोपा योग :- ‘चेअर योगा’मध्ये खुर्चीवर बसून शरीराच्या विविध भागांना सक्रिय केले जाते.
- सर्व वयोगटांसाठी उपयुक्त : सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांसाठी हा योग प्रकार फायदेशीर ठरू शकतो.
- विविध व्यायाम प्रकारांचा समावेश : मानेची हालचाल, खांदे फिरवणे, खुर्चीवर बसून पाठीचा व्यायाम (सीटेड कॅट-काऊ), घोट्यांचे व्यायाम आणि श्वसनाचे तंत्र अशा सोप्या व्यायाम प्रकारांचा यात समावेश आहे.
- शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायी : नियमित सरावामुळे पाठ आणि मानदुखी कमी होते, रक्ताभिसरण सुधारते व ताण-तणाव कमी होतो. याशिवाय शरीराची हालचाल सुरळीत होऊन शरीर सक्रिय राहते.
-----------
कधी व कोठे

५ आणि ६ डिसेंबर, पंडित फार्म्स , कर्वेनगर, पुणे.
वेळ :- दोन्ही दिवशी सकाळी ६.३० पासून
प्रवेश विनामूल्य असून, नावनोंदणी आवश्यक आहे.
सौरभ बोथरा यांच्या ‘चेअर योगा’ मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व नावनोंदणीसाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा. पूर्व नावनोंदणीशिवाय कार्यशाळेला प्रवेश दिला जाणार नाही. (‘चेअर योगा’ कार्यशाळेसाठी येताना फक्त स्वतःचे पिण्याचे पाणी, नॅपकिन व स्वतःची आवश्यक औषधे सोबत ठेवावी.)
---------------
फोटो ः 66683, 66685, 66688, 66689

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात एक्स्पायर झालेली क्षेपणास्त्रे वापरली; सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर सुनावणी

Truck Bike Accident : तेरवीहून परतताना पती-पत्नी ठार; शिंदोला मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

Chadrapur Crime : चंद्रपूर हादरले! चौकात कवटी, रेल्वे पटरीलगत मृतदेह; दोन्ही अवयव एकाच व्यक्तीचे असल्याचा संशय

Dengue-Like Infection : मुंढेत ४० जणांना डेंगीसदृश्य लागण; गावात खळबळ

Amravati Fire : वलगाव मार्गावरील हबीब नगर परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता; अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण

SCROLL FOR NEXT