Chaitanya Maharaj Palkhi Otur esakal
पुणे

Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी ओतूरच्या चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रयाण; यंदा पालखी सोहळ्याचे हे तब्बल 64 वे वर्ष

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांची ओतूर येथे संजीवन समाधी आहे.

पराग जगताप

पंढरपूर येथे पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवार (ता. २१) जुलै रोजी परतीचा प्रवास सुरु होणार आहे. सोमवार (ता. ४) ऑगस्ट रोजी पालखीचे ओतूर येथील पांढरी मारूतीचे मंदिर येथे पुनरागमन होणार आहे.

ओतूर : ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरीच्या मंत्रघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज यांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पायी पालखीचे (Chaitanya Maharaj Palkhi) ओतूर (ता. जुन्नर) येथून पंढरपूरला आषाढी वारीसाठी बुधवारी सकाळी ११ वाजता प्रयाण झाले.

याबाबत चैतन्य महाराज प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष आत्माराम गाढवे व सचिव अनिल तांबे म्हणाले, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांची ओतूर येथे संजीवन समाधी आहे. यामुळे ओतूर येथून जाणाऱ्या या पालखीला पंढरपूर पायी वारी (Ashadhi Wari Pandharpur) सोहळ्यात मानाचे स्थान आहे. ओतूर ग्रामस्थाच्या सहकार्याने सुरू केलेल्या या पालखी सोहळ्याचे हे ६४ वे वर्ष आहे.

मंगळवारी या पालखी सोहळ्यास सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरापासून सुरूवात झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात व राम कृष्ण हरी या मंत्रघोषात पालखी सोहळा निघाल्यानंतर ओतूर पोलिसांकडून सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी पोलीस ठाण्यासमोर पोलखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर ओतूर शहराला नगर प्रदक्षिणा घालून नंतर पालखीचा पहिला मुक्काम ओतूर शहरातील मुख्य चौक पांढरी मारूती मंदिरात झाला.

तद्नंतर बुधवारी सकाळी वैभव डेरे यांनी सपत्नीक अभिषेक व पूजा केली, तर शंकर डुंबरे यांनी भाविकांना प्रसादाचे वाटप केले. पै. शैलेश तांबे यांनी रथासाठी बैलजोडी दिली. ओतूर येथून पालखी प्रयाणावेळी भव्य मिरवणूक निघाली होती, त्यात चैतन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशा, लेझीम व झेंडा पथकाचा सहभाग होता. तर, महिलांच्या टाळ पथकाने ही या वर्षी मिरवणुकीत सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली. तसेच श्री बाबाजी चैतन्य महाराज प्रासादिक भजन मंडळाचे संस्थापक महादेव तांबे, उपाध्यक्ष रघुनाथ तांबे, ज्ञानेश्वर पानसरे, शांताराम महाराज वाकर, विलास घुले, शांताराम पानसरे, गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वैभव तांबे, गंगाराम महाराज डुंबरे, महेंद्र पानसरे, राजेंद्र डुंबरे, जितेंद्र डुंबरे, सागर दाते, संतोष नवले, रोहिदास घुले, प्रकाश डुंबरे, पाडुरंग ढोबळे, ज्ञानेश्वर पानसरे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, माजी जि.प. सदस्य मोहित ढमाले, तुषार थोरात व परिसरातील शेकडो भाविक सहभागी झाले होते.

गावात भक्तीमय वातावरण

संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण होऊन सर्वत्र रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष चालू होता. सदर पायी पालखी ओतूर, आळे, बेल्हा, पाडळी, लोणी मावळा, रांधे दरोडी फाटा, वडझिरे, पारनेर, पाणोली घाट, पिंपळनेर, राळेगण सिद्धी, ढवळगाव, उक्कडगाव, बेलवंडी, श्रीगोंदा, घोडेगाव, चांदगाव, टाकळी, जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, सिध्दटेक, बारडगाव, येसवडी, राशीन, कोर्टी, विहाळ, वीट, झरे, वांगी कविटगाव, कंदर, टेंभुर्णी, अरण, मोडलिंब, आष्टी, बाबळगाव मार्गे पालखी १९ दिवसांनी रविवार (ता. १४) जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे दाखल होणार आहे.

Chaitanya Maharaj Palkhi Otur

वारकऱ्यांचा ४१ दिवसांचा प्रवास

पंढरपूर येथे पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवार (ता. २१) जुलै रोजी परतीचा प्रवास सुरु होणार आहे. सोमवार ता. ४ ऑगस्ट रोजी पालखीचे ओतूर येथील पांढरी मारूतीचे मंदिर येथे पुनरागमन होणार आहे. एकूणच हा वारकऱ्यांचा प्रवास ४१ दिवसांचा आहे. या पालखी सोहळ्याचे सर्व नियोजन श्री बाबाजी चैतन्य महाराज प्रासादिक भजन मंडळ व समस्त ग्रामस्थ ओतूर हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT