पुणे

चाकणला बीओटी तत्त्वावर विमानतळ?

हरिदास कड

चाकण - चाकण परिसरात होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्‍यात गेले असले तरी एमआयडीसीने भूसंपादनासाठी पुढाकार घेतल्यास चाकणला बीओटी तत्त्वावर विमानतळ होण्याची शक्‍यता आहे. यासाठी काही उद्योजक सरकारदरबारी प्रयत्न करीत आहेत. त्यास यश आल्यास चाकणला विमानतळ होऊ शकते.   

चाकण औद्योगिक वसाहत ही मावळ तालुक्‍याच्या औद्योगिक वसाहतीला खेटून आहे. चाकण तसेच तळेगाव औद्योगिक वसाहत, शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्यादृष्टीने विमानतळ निकडीचे होते. गेल्या अठरा वर्षांपासून राज्यकर्ते केवळ चाकणला विमानतळ होण्याच्या घोषणाच करीत राहिले. या कालावधीत ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले त्या सर्वांनीच या परिसरात गुंतवणूक करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक कारणास्तव हे विमानतळ पुरंदरला गेले. 

सद्यःस्थितीत वरील औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक लोहगाव, मुंबई येथील विमानतळाचा वापर करीत आहेत. उद्योजकांची धावपळ कमी व्हावी, त्यांचा वेळ वाचावा, कंपन्यांचा तसेच शेतमालाची आयात - निर्यात सुलभ व्हावी यासाठी चाकण परिसरातील विमानतळाबाबत अनेकदा घोषणा झाल्या. परंतु, विमानतळ रद्द झाले. नियोजित पुरंदर विमानतळ हे चाकणपासून सव्वाशे किलोमीटरवर आहे.  ते येथील उद्योजकांच्या दृष्टीने फारसे सोयीचे नसल्याने या भागात एमआयडीसीच्या पुढाकाराने विमानतळाची निर्मिती करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे. 

गुंतवणुकीवर मोठा परिणाम
विमानतळ पुरदंरला गेल्याने चाकण परिसरातील औद्योगिक गुंतवणुकीवर तसेच जमिनींच्या व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. काही कंपन्यांनी गुजरात, कर्नाटक, आंध्र, झारखंड येथे कंपन्या नेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्‍यता आहे. 

चाकणला खऱ्या अर्थाने विमानतळाची गरज आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत ऑटोमोबाईल हब आहे. चाकण परिसरात बहुराष्ट्रीय कंपन्या असल्याने अनेक परदेशी उद्योजक, कंपन्यांच्या प्रतिनिधींची वर्दळ असते. पुरंदरचा विमानतळ या भागातील उद्योजक, कंपन्यांचे प्रतिनिधी यांना फारसा उपयोगी ठरणार नाही. 
-दिलीप बटवाल सचिव,  फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT