पुणे

हॉर्न वाजवल्याच्या रागातून एसटी बसची तोडफोड

CD

चाकण, ता. ४ : चाकणमध्ये हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून मोटारीमधील दोघांनी एसटी बोरी-मुंबई (क्र. एमएच १२ बीटी ४२४९) बस थांबवून लोखंडी रॉडने तोडफोड केली. त्यांनी चालक आणि महिला वाहकाला शिवीगाळ करत मारहाणही केली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याची मोटार (एमएच १२ पीसी ९९६५) जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
कुणाल डफळ (वय ३०, रा. रासे, ता. खेड) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. तर चालक अशिफ पटेल (रा. राजुरी, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, चाकण-तळेगाव मार्गावरील श्रेया लॉन्ससमोर दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. नारायणगाव आगाराची बस चाकणमार्गे मुंबईकडे जात असताना वाहतूक कोंडीमुळे चालकाने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने लाल रंगाच्या कारमधून आलेल्या दोघांनी बस थांबवली.
एकाने लोखंडी रॉडने चालक पटेल यांच्या हातावर मारहाण केली, तर दुसऱ्याने महिला वाहकाला शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी बसची पुढील, दरवाजाची आणि दोन खिडक्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. बसमधील सुमारे ४० ते ४५ प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर आणि लोक जमायला लागल्यावर आरोपी तळेगावच्या दिशेने पळून गेले. तर फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आरोपीचा बसची तोडफोड करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
"एका आरोपीला ताब्यात घेतले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे," अशी माहिती चाकण उत्तरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : घनसावंगी पंचायत समितीच्या कामांमध्ये दुमजली कामाचा स्लॅबचा कॉलम पडून मुजराचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT