चाकण, ता. २४ : खेड तालुक्यातील चाकण बाह्यवळण मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पीएमआरडीएच्या वतीने सुरू झाली आहे. या मार्गाच्या मोजणी दरम्यान काही शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या होत्या त्या बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे समुपदेशन करण्यासाठी गुरुवारी (ता. २६) दुपारी दोन वाजता मेदनकरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. त्याबाबतचे पत्र पीएमआरडीएचे कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल यांनी मेदनकरवाडीचे सरपंच, ग्रामसेवक यांना दिले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वतीने प्रस्तावित कडाचीवाडी, मेदनकरवाडी बंगला वस्ती असा पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा सुमारे ३६ मीटर रुंदीचा अडीच किलोमीटर लांबीचा मार्ग होणार आहे. हा हा मार्ग चारपदरी आहे. काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा तसेच काही ठिकाणी डांबरीकरणाचा असणार आहे. योग्य ठिकाणी पर्यायी मार्ग काढण्यात येणार आहे त्यामुळे वाड्या ,वस्त्यांचा येण्या-जाण्याचा प्रश्न सुटणार आहे. बंगलावस्ती येथे पुणे-नाशिक महामार्गाला जोडतो तर कडाचीवाडी येथील गणपती मंदिराच्या पुढे काही अंतरावर चाकण शिक्रापूर मार्गाला जोडतो. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांतील अवजड वाहनांची वाहतूक मुख्य चौकात तळेगाव , माणिक चौक, चाकण शहरात न जाता ही बाह्यवळण मार्गाने होईल त्यामुळे वाहतूक कोंडी सुरळीत होण्याची आशा आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने भूसंपादन करण्यात येणार आहे. भूसंपादन झाल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांच्या आत या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. हे काम जेवढे लवकर होईल तेवढे पीएमआरडीए प्रयत्न करत आहे.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.