पुणे

रोहित्र फोडले, तारा लुटल्या; चौघांना बेड्या

CD

चाकण, ता.४ :  खेड तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा चोरून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा युनिट-३ ने अटक केली आहे. याप्रकरणी मुद्देमाल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकांसह चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण १६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चोरटे अक्षय बाबासाहेब काळे (वय ३४), राहुल दिनकर पोकळे (वय २०), आणि भंगार व्यावसायिक  ईजहार इस्माइल चौधरी (वय ४०), ब्रिजमोहन असर्फीलाल प्रजापती (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी, वडगाव घेनंद परिसरात गेल्या काही दिवसांपासून विद्युत रोहित्रांमधील तार चोरीच्या घटनांनी जोर धरला होता. या गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.
गुरुवारी (ता. ३) पोलिस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत भानोबाची कोयाळी परिसरात काही संशयित व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून काळे आणि पोकळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी ललित मगर ऊर्फ नेपाळ याच्यासोबत मिळून रोहित्रामधील तारा चोरल्याची कबुली दिली. तसेच, चोरलेला माल भानोबाची कोयाळी येथील भंगार व्यावसायिकांना विकल्याचेही त्यांनी सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भंगार व्यावसायिक चौधरी आणि प्रजापती या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ लाख १० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या. या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे आणि त्यांच्या पथकातील बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, ऋषीकेश भोसुरे, युवराज बिराजदार, सागर सूर्यवंशी, सचिन गोनटे, बाळासाहेब खेडकर, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, निखील फपाळे, नितीन गुंजाळ, शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले यांनी केली.

गुन्ह्यांची उकल
आळंदी व दक्षिण चाकण पोलिस ठाण्यांतील सात गुन्हे उघड.
गुन्ह्यांतील चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत.
चोरीसाठी वापरलेली तीन दुचाकी व चारचाकी वाहने जप्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

India vs Japan: टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी खेळला जाणार ऐतिहासिक सामना? BCCI कडून घोषणा

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT