पुणे

कोंडीचे संकट नऊ मीटरच्या निर्णयाने गहिरे

CD

चाकण, ता. ५ : औद्योगिक वसाहत परिसरातील गावातील रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई सुरू असताना ही अतिक्रमणे १२.५ मीटरवरून ९ मीटरपर्यंत कमी केली आहेत. यामुळे काही व्यावसायिकांना दिलासा मिळाला असला तरी वाहतूक कोंडी मात्र कायम राहणार आहे, अशी भीती चाकण परिसरातील नागरिक, कामगारांकडून व्यक्त केली आहे.
प्रशासनाने नऊ मीटरमध्ये येणारी अतिक्रमणे काढली तरी रस्ते फार रुंद होणार नाहीत. या रस्त्यावर अवजड वाहने, कंटेनर, ट्रेलर, मालवाहतूक आणि इतर वाहनांची मोठी वाहतूक आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला तरी पुढील काळात वाहतूक कोंडी कायम राहील.
अतिक्रमणाबाबत आमदार बाबाजी काळे यांनी प्रशासनाकडे केलेल्या मागणीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा
९ मीटरचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे होणारे काही व्यावसायिक, नागरिकांचे नुकसान सध्या तरी टळले असून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पण पुढे नक्की प्रशासन काय करणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
चाकण-भांबोली रस्त्यावरील बिरदवडी, आंबेठाण येथील नागरिकांनी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती, तसेच आंदोलनाचा इशारा दिला होता. आमदार काळे यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत हा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी सांगितले की, ‘‘सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या पाच प्रमुख जिल्हा मार्गांवर ही अतिक्रमण कारवाई केली जात आहे. या कारवाईचा निकष ९ मीटर असावा अशी सर्वसामान्यांची भावना आहे. त्यानंतर डुडी यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे कारवाई होणाऱ्या पाच प्रमुख जिल्हा मार्गावरील व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

नागरिक, कामगारांच्या मते
- अतिक्रमण कारवाई ही साडेबारा मीटर ऐवजी नऊ मीटरवर होणार
- चाकण परिसरातील काही व्यावसायिकांचे नुकसान टळले
- वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने रस्ते पुरेसे रुंद करणे गरजेचे आहे
- अतिक्रमण कारवाई मोठ्या प्रमाणात झाली नाही तर वाहतूक कोंडी तशीच राहील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dahihandi : दहीहंडीत डीजेचा आवाज ९० डेसिबलपर्यंत; नियमांची मर्यादा ओलांडली

डीजेवर नाचतानाचा VIDEO व्हायरल; विद्यानंद बापट म्हणाले, ‘बघणाऱ्यांची कीव येते’

Marathi News Live Updates: थेऊर फाटा येथे ट्रक अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू

IND vs PAK Asia Cup: पाकिस्तानच्या २८ धावांत १० विकेट्स! भारतासमोर शेजाऱ्यांनी गुडघे टेकले, T20 तील लाजीरवाणी कामगिरी

पाकिस्ताननं आता 'नापाक कृत्य' करण्याचा प्रयत्न केल्यास...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT