Chakan Encroachment sakal
पुणे

Chakan Encroachment : वीज कंपनीचे गौडबंगाल काही समजेना! चाकणला विजेचे खांब आणि विद्युत रोहित्र ठरत आहेत अतिक्रमणातील डोकेदुखी

चाकण येथील पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-शिक्रापूर, चाकण-तळेगाव मार्गावर वीज कंपनीचे विद्युत खांब तसेच विद्युत रोहित्र, नगर परिषदेचे दिव्यांचे खांब अतिक्रमण काढताना डोकेदुखी ठरत आहेत.

हरिदास कड

चाकण - येथील पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-शिक्रापूर, चाकण-तळेगाव मार्गावर वीज कंपनीचे विद्युत खांब तसेच विद्युत रोहित्र, नगर परिषदेचे दिव्यांचे खांब अतिक्रमण काढताना डोकेदुखी ठरत आहेत. अतिक्रमणे काढली जात आहेत परंतु वीज कंपनीचे विद्युत खांब, विद्युत रोहित्र ही अतिक्रमण काढताना डोकेदुखी ठरत आहेत. हे काय वीज कंपनीचे गौडबंगाल आहे हे समजतं नाही, असा सवाल नागरिकांचा आहे.

त्यांच्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावले आहे. हे सर्व विद्युत खांब, विद्युत रोहित्र यांची अतिक्रमणे सरकारी जागेत आलेली आहेत. त्यामुळे ही अतिक्रमणे काढण्यासाठी सुमारे 44 लाखावर खर्च आहे. विद्युत खांब,विद्युत रोहित्र यांची अतिक्रमणे काढल्यानंतर हा मार्ग मोकळा होणार आहे आणि त्यानंतर रस्त्याची कामे संबंधित विभागाने लवकर करून घ्यावीत अशी नागरिकांची मागणी आहे.

चाकण, ता. खेड येथे नगरपरिषदेच्या हद्दीत, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी ग्रामपंचायत च्या हद्दीत चाकण- शिक्रापूर, पुणे-नाशिक मार्गावर अतिक्रमणाची कारवाई एनएचएआईचे अधिकारी नगरपरिषदचे अधिकारी, ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत जोरात सुरू आहे.

सध्या तात्पुरत्या स्वरूपाची पत्र्याची शेड, फलक व इतर स्वरूपाची अतिक्रमणे काढली जात आहेत. काहींचे बांधकाम ओटे पाडले जात आहेत. पण ही अतिक्रमणे काढली जात असताना विद्युत खांब, रोहित्र अतिक्रमणाच्या जागेतच आहे त्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावले आहे. बऱ्याच इमारत, गृह, व्यवसायिक प्रकल्पाच्या पुढे विद्युत खांब,विद्युत रोहित्र आहेत.

अतिक्रमण धारकांनी ही विद्युत रोहीत्र, विद्युत खांब आपल्या अतिक्रमणाच्या समोर जाणून -बुजून उभे केलेले आहेत त्यामुळे अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केलेले आहे, असा आरोप नागरिकांचा आहे.अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर हे विद्युत खांब, विद्युत रोहित्र हटवणे महत्त्वाचे आहे. हे विद्युत रोहित्र, विद्युत वाहिनी, खांब हटवण्यासाठी अंदाजे सुमारे 44 लाखावर खर्च अपेक्षित आहे.

याबाबतीत आमदार दिलीप मोहिते यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. वीज कंपनीने प्रस्ताव पाठविलेला आहे.यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर विद्युत रोहित्र, खांब तत्काळ काढण्यात येतील असे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.

वीज कंपनीने विद्युत रोहित्र, विद्युत खांब हलविल्यानंतरच अतिक्रमण जागेतील मार्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे हे विद्युत खांब, विद्युत रोहित्र लवकर स्थलांतरित करावे व रस्ता वाढवावा अशी मागणी आहे. अतिक्रमणे काढल्या जागी लवकर रस्ता केला नाही तर पुन्हा अतिक्रमणे होतील याला जबाबदार कोण असाही सवाल नागरिकांचा आहे.

वीज कंपनीचे अधिकारी जबाबदार

चाकणला प्रत्येक मार्गावर सरकारी जागेत अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे.मोठ्या इमारती उभारल्या नंतर त्यांच्यापुढे विद्युत रोहित्र, खांब रस्त्याच्या कडेला बसविण्यात आलेले आहेत. वीज कंपनीचे काही अधिकारी तसेच काही व्यवसायिक यांच्यात आर्थिक तडजोडी होऊन ही विद्युत रोहित्र बसविण्यात आलेली आहेत असा आरोप नागरिकांचा आहे. सरकारी यंत्रणेला अतिक्रमणे काढताना पुरेपूर अतिक्रमणे काढता येत नाही.

त्यामध्ये विद्युत रोहित्रांचा व विद्युत खांबांचा अडथळा येतो आहे. व्यवसायिकांनी आपल्या इमारती बांधताना तसेच पत्र्याची शेड टाकताना जाणून-बुजून पुढे विद्युत रोहित्र, विद्युत खांब उभे केले आहेत. जेणेकरून अतिक्रमण कारवाई होताना त्याच्यापुढे कारवाई झाली नाही पाहिजे असा त्यांचा उद्देश आहे. याला जबाबदार वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आहेत असा आरोप नागरिकांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: देशात भाजप असताना कॉक्रोच जनता पक्षाची गरज काय? आठवले म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज, संवर्धनाच्या कामासाठी २३,२४ जूनला दर्शन पूर्ण बंद

Yavatmal: पत्नीसह २ मुलांना विहिरीत ढकललं, नंतर ३५ वर्षीय पतीनं स्वत:लाही संपवलं, यवतमाळ हादरलं

Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

INDW vs PAKW: भारताची टी-२० वर्ल्डकप मोहीम आजपासून; आज भारत-पाक आमनेसामने, कशी असेल Playing 11

SCROLL FOR NEXT