चाकण, ता. ३० : चाकण, महाळुंगे परिसरातील औद्योगिक वसाहतीतील हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाबे तसेच पार्टी लॉन्समध्ये वाद्यवृंदासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब कड व राजेंद्र जाधव यांनी सांगितले.
शहरातील प्रमुख चौक, हॉटेल परिसर आणि संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मद्यधुंद वाहनचालकांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून नाकाबंदी व तपासणी मोहिमा राबवण्यात येणार आहे, असे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे यांनी सांगितले.
चाकण, महाळुंगे औद्योगिक वसाहतीतील परिसरातील हॉटेल मालक, चालक, रेस्टॉरंट मालक चालक, ढाबे मालक यांची पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे. त्यांना शासनाच्या व पोलिसांच्या नियमाबाबत सूचना दिलेल्या आहेत, असे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, तसेच चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी सांगितले.