पुणे

चाकण औद्योगिक वसाहतीला प्रदूषणाचा विळखा

CD

चाकण, ता. १०: येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून होणाऱ्या हवा, जल आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक व कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जलस्रोत प्रदूषित होत असून श्वसनाचे विकार वाढले आहेत.
चाकण परिसरात औद्योगिकीकरण वाढले असले तरी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. अनेक कंपन्या रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडत असल्याने विहिरी, नाले आणि पाझर तलाव प्रदूषित झाले आहेत. यामुळे लहान मुले व ज्येष्ठांना श्वसनाचे त्रास आणि डोळ्यांची जळजळ जाणवत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

साठ मेंढ्यांचा मृत्यू; गावांची दुरवस्था
महाळुंगे येथे रसायनयुक्त पाण्यामुळे यापूर्वी ६० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भांबोली, नाणेकरवाडी, खराबवाडी, बिरदवडी, आंबेठाण, सावरदरी, खालुंब्रे, कुरुळी, निघोजे, महाळुंगे, शिंदेगाव, वासुली, आसखेड, वाकीबुद्रुक, वाकी खुर्द, चिंबळी, मोई, वराळे, मेदनकरवाडी या गावांमध्ये सांडपाण्यामुळे कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. आर्थिक फायद्यासाठी अनेक कंपन्या एसटीपी प्लांट न उभारता रात्रीच्या वेळी चोरून सांडपाणी नदी-नाल्यांत सोडतात. चाकण-आळंदी मार्गावरील रोटाई तळ्यातही टँकरद्वारे सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

उपाययोजनांची आवश्यकता
कंपन्यांनी आधुनिक फिल्टर यंत्रणा बसवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. केवळ नफ्याला महत्त्व न देता पर्यावरण रक्षणाला प्राधान्य द्यावे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘‘नागरिकांच्या तक्रारीनुसार, ज्या कंपन्या रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर किंवा जलस्रोतात सोडतात, त्यांची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा, दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल.’’
-नितीन गोरे, सदस्य, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT