पुणे

मध्यप्रदेशातील हिरव्या वाटण्याला पसंती

CD

चाकण, ता. १ : येथील (ता. खेड) खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजाराच्या आवारात रविवारी (ता.१) मध्यप्रदेशातून पन्नास टन हिरव्या वाटाण्याची आवक झाली त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. गवार, राजमा वालाच्या शेंगा, हिरवी मिरची, वालवर, वांगी, भेंडी यांचे बाजारभाव किरकोळ बाजारात प्रतिकिलाेने वाढले आहेत. शेवग्याच्या शेंगांना तसेच हिरव्या मिरचीला शंभर रुपये प्रतिकिलोला बाजारभाव मिळाला.

बाजारात वाटाण्यास घाऊक बाजारात प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये बाजारभाव मिळाला. नव्याने काढणी केलेल्या तीस टन बटाट्याची आवक झाली तसेच बटाट्याला मागणी मोठ्या प्रमाणात राहिली. नागपूरहून हिरव्या मिरच्यांची सुमारे तीस टन आवक झाली. हिरव्या मिरचीचे भाव प्रति किलोला चाळीस रुपयांनी वाढले .राजस्थानातून गाजराची सुमारे वीस टन आवक झाली. गुजरातहून तसेच नागपुरातून हिरव्या काळ्या व पिवळ्या मिरचीची मिळून सुमारे तीस टन आवक झाली. मध्यप्रदेशातील इंदोर बटाट्याला तसेच स्थानिक नव्या बटाट्याला प्रतिकिलोला तेरा, चौदा रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याची सुमारे साडेनऊ हजार क्विंटल आवक झाली. कांद्यास प्रतिकिलोला आठ ते १६ रुपये भाव मिळाला.
बाजार आवारात नाशिक,सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे तीस टन आवक झाली. टोमॅटोला बाजारभाव २० ते ३० रुपये प्रतिकिलोला घाऊक बाजारात मिळाला.

फळभाज्यांचे प्रति किलोचे भाव (रुपयांत) पुढील प्रमाणे : टोमॅटो : २०-३०, कारली : ३०-३५, दोडका : ४०-५०, भेंडी : ५०-६०, गवार : ८०-१००, कोबी : १५, फ्लॉवर : १५ , वांगी : ३०, हिरवी मिरची : १००, दुधी भोपळा : ३०, शेवगा : १२०, ढोबळी मिरची : ३५, चवळी : ३०, हिरवा वाटाणा : २५-३०, काकडी : ३५, गाजर : २०, आले : ५०.


दोन लाखावर जुड्यांची आवक
कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकच्या सुमारे दोन लाखावर जुड्यांची आवक झाली .मेथीच्या व कोथिंबीरीच्या एका जुडीला १० ते १२ रुपये भाव मिळाला. शेपू, पालकच्या एका जुडीला १० रुपये बाजारभाव मिळाला.


10254

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

Sim Card Rules : रिचार्ज न केल्यास सिमकार्ड किती दिवसांनी बंद होतं? नवा नियम आहे खूपच फायद्याचा

SCROLL FOR NEXT