पुणे

lockdown : चाकण एमआयडीसीचा आवाज बंदच 

सकाळवृत्तसेवा

चाकण - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चाकण औद्योगिक वसाहतीतील एक हजारावर छोट्या, मोठ्या कंपन्या बंद आहेत. सरकारच्या आदेशानुसार वीस एप्रिलला कंपन्या सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु कडक नियम त्यात बहुतांश कामगार, कंपनी अधिकारी पुणे, पिंपरी, चिंचवड भागातील असल्याने व तो भाग सील केल्याने व मोठ्या प्रमाणात कामगार गावी गेल्याने कामगारांअभावी कंपन्या सुरू झाल्या नाहीत. 

चाकण औद्योगिक वसाहतीत एक हजारावर छोट्या, मोठ्या कंपन्या आहेत. त्यातून तीन लाखावर कामगार काम करतात. औद्योगिक वसाहतीतील बजाज ऑटो, महिंद्रा, केहीनफाय, ब्रिजस्टोन, हुंडाई, व्होक्सव्हॅगन, भारत फोर्ज, सॅनिइंडिया व इतर बहुराष्ट्रीय कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. २० एप्रिलला कंपन्या सुरू कराव्यात असे आदेश सरकारने काढले आहेत. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची निवासाची व्यवस्था कंपनीत केली पाहिजे व इतर नियमावली असल्याने कंपन्या सुरू झाल्या नाहीत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कंपन्या सुरू न झाल्याने कामगार नेते, कामगार यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. लॉकडाउनमुळे तीन लाखांवर कामगार घरी बसला आहे. त्यांना आर्थिक विवंचना सतावते आहे, 
- जीवन येळवंडे, कामगार नेते 

आज एकही कंपनी सुरू झालेली नाही. येत्या तीन मेनंतर कंपन्या सुरू होतील अशी शक्यता आहे. 
- बालाजी सोनटक्के, वरिष्ठ पोलिस निरीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT