पुणे

चाकण एमआयडीसीत अवैध पार्किंगवर कारवाई

CD

कुरुळी, ता. १७ : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता. १७) चाकण एमआयडीसीतील समस्यांची पाहणी करून कालबद्ध उपाययोजनांचे निर्देश दिले. यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने अंमलबजावणी करत तळवडे-महाळुंगे रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या असलेल्या ८७ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. उद्योजकांनी अतिरिक्त वाहतूक वॉर्डनची मागणी केली आहे.
चाकण एमआयडीसी परिसरात अनेक मोठे वाहन उत्पादन करणारे कारखाने आहेत. या कारखान्यांसाठी कच्चा व पक्का माल वाहून नेणारी अवजड वाहने अनेकदा रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे उभी केली जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन अपघात घडत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. उद्योगमंत्र्यांच्या सूचनेनुसारच वाहनावर कारवाई करण्यात आल्याची माहिती महाळुंगे वाहतूक पोलिस निरीक्षक नितीन वाघमारे यांनी दिली. या वेळी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. एमआयडीसी परिसरातील वाहतूक नियंत्रणासाठी महाळुंगे वाहतूक विभागाला अतिरिक्त वॉर्डन संदर्भात मंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोर्टाचा FDAला दणका! पुण्यातील दुकानदाराला ५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?

World Padel League चे गेम चेंजर्स लायन्स ठरले पहिले चॅम्पियन! ऑसी मॅव्हरिक जॅग्वार्सचा फायनलमध्ये पराभव

Digras News : उबाठाकडून खासदार संजय देशमुखांना घरपोच नोटीस

Pune Grand Tour : सायकल स्पर्धेच्या निविदेत प्रशासन एक पाऊल मागे

Pune News : आमदार सुनील कांबळे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT