पुणे

ज्येष्ठाचा खून करणाऱ्या तिघांना अटक

CD

चाकण, ता. १९ : नाणेकरवाडी (ता. खेड) येथे किरकोळ धक्का लागल्याच्या वादातून एका ज्येष्ठाचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी ४८ तासांत अटक केली. नाजीर शेख (वय ६०, रा. पश्चिम बंगाल) असे मृताचे नाव असून, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली.
रोहन मोहन शिंदे, वय २४, रा. वाडा रोड, ता. खेड, मूळ रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) योगेश पोपट पवार (वय २३, रा. बिरदवडी, ता. खेड, मूळ रा. भोसरी, पुणे), रवींद्र राजेंद्र शेजुळ (वय ३०, रा. बिरदवडी ता. खेड, मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (ता. १४) रात्री पावणेबाराच्या सुमारास आयएआय कंपनीच्या मागील रस्त्यावर घडली. आरोपींनी किरकोळ वादातून नाजीर शेख यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. १५) त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर कोणताही ठोस पुरावा नसताना तपासपथकाने ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. मोबईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा पुणे व नाशिक जिल्ह्याशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी खेड, मंचर, संगमनेर आणि नाशिक परिसरात शोधमोहीम राबवून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण दक्षिण पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: मनीषा मांढरेच्या लॉकरमध्ये सापडल्या जुन्या प्रश्नपत्रिका; सीबीआयचे अधिकारी पुण्यात तळ ठोकून

Jal Jeevan Mission Takali Rajerai: मनसेच्या आक्रमक भूमिकेला यश; टाकळी राजेरायच्या सकसआहार वस्तीस जलजीवन मिशनमधून पाणीपुरवठा सुरू करण्याची हालचाल

Latest Marathi News Live Update : दिल्लीत २०२६ मधील विजेच्या मागणीचा उच्चांक नोंदवला गेला

KKR vs MI Live: स्वाभिमानासाठी खेळणार? रवी शास्त्रींच्या प्रश्नावर हार्दिक पांड्याचं उत्तर Viral अन् मुंबईने ९ चेंडूंत गमावल्या ३ विकेट्स...

Ashadhi Wari Sant Eknath Palanquin: अधिकमासामुळे संत एकनाथ महाराज पायी दिंडी वारीचे प्रस्थान एक महिना उशिरा; पैठणहून ७ जुलैला पंढरपूरकडे पालखी रवाना

SCROLL FOR NEXT