पुणे

चाकण बाजारात कांदा भावात चढ-उतार

CD

चाकण, ता. ८ : राज्यात प्रसिद्ध असलेल्या चाकण येथील कांदा बाजारात गेल्या काही दिवसांपासून भावात सातत्याने चढ-उतार होत आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुमारे एक हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. या वेळी कांद्याला प्रतवारीनुसार किमान ३५ ते कमाल ४३ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे आणि सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने कांदा लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. नवीन कांद्याची आवक सुरू होण्यास अद्याप एक ते दोन महिन्यांचा विलंब आहे. सध्या बाजार पूर्णपणे जुन्या साठवलेल्या कांद्यावर अवलंबून आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून नवीन कांदा दिल्लीसह इतर मोठ्या बाजारपेठांत विक्रीसाठी दाखल होत असल्याने स्थानिक पातळीवर भावात घसरण होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. भावातील या अनिश्‍चिततेमुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हिवाळी हंगामाच्या सुरुवातीला चांगल्या भावाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, बाजारातील मागणी आणि साठवलेल्या जुन्या कांद्याचे प्रमाण यामुळे भावात बदल होत आहेत. उत्पादन खर्च, वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च यांचा ताळमेळ बसवणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. सरकारने बाजारपेठेचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना रास्त भाव मिळवून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उत्पादकांकडून केली जात आहे.

दुष्काळामुळे क्षेत्र घटणार
राज्यात जून आणि जुलै महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्याने कांदा लागवड अत्यंत कमी झाली आहे. नवा कांदा नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान बाजारात येण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत केवळ १० ते २० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या बाजारात जुना साठवलेला कांदा विक्रीसाठी येत असून, दुष्काळामुळे भविष्यात भाव वाढण्याची अपेक्षा असल्याचे व्यापारी माणिक गोरे आणि विक्रम शिंदे यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात भाव चढेच
घाऊक बाजारात चढ-उतार असले तरी किरकोळ बाजारात कांद्याचे दर चढेच आहेत. किरकोळ विक्रीत कांदा ५० ते ७० रुपये प्रतिकिलो भावाने विकला जात आहे. अगदी लहान आकाराचा चिंगळी कांदाही ५० रुपये किलोवर पोहोचल्याने सर्वसामान्य ग्राहक आणि कामगार वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

SA vs AUS Schedule: ८ वर्षांनंतर जुने हिशोब चुकते होणार?'सँडपेपरगेट' राड्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळणार

Latest Marathi News Live Update: अतिक्रमण हटाव पथकाची धडक कारवाई

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

SCROLL FOR NEXT