पुणे

कर वेळेत भरा, कारवाई टाळा

CD

चाकण, ता. ७ : येथील मालमत्ता धारकांनी मालमत्ता व पाणीपट्टी कराचा वेळेवर भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी केले आहे.
मार्च महिना सुरू झाल्याने चाकण नगरपरिषदेच्या वतीने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थकीत कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम अभियान राबविण्यात येत असून मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नगरपरिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रभागानुसार पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाद्वारे विशेष वसुली मोहीम अभियानांतर्गत चाकण शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तांचे सोसायटी, शाॅप, दुकानांचे, बँकांचे नळजोड तोडणे, मालमत्ता जप्ती करणे, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे व शहरातील विविध भागात थकबाकीदारांच्या नावांचा फ्लेक्स लावणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी मालमत्ताधारकांनी आपल्याकडे असलेल्या मालमत्ता व पाणीपट्टी कराचा वेळेत भरणा करून होणारी संभाव्य कारवाई टाळण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी केले आहे. यावेळी कर विभाग प्रमुख सुनील गोर्डे उपस्थित होते,.

सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू
नागरिकांना मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा करण्यासाठी शनिवार, रविवारसह इतर सुट्टीच्या दिवशी सुद्धा नगरपरिषदेचे वसुली विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. शहरातील विविध सहकारी सोसायट्यांमध्ये वसुलीसाठी विशेष कॅम्पचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी, मालमत्ता धारकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्याकडे असणाऱ्या कराचा वेळेत भरणा करण्याचे आवाहन डॉ.‌ अंकुश जाधव यांनी केले आहे.

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

T20 WC , IND vs NZ: न्यूझीलंडच्या कर्णधारानेही भारतीयांनाच दिली वॉर्निंग; २०२३ वर्ल्ड कपमध्ये फायनलला जे झालं, तसंच उद्या पण...

Iran-America War: ''ते चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते..'', अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचं जहाज बुडाल्यानंतर भारताची प्रतिक्रिया

डोळ्यात आणि तोंडात तिखट टाकलं, अमानुष मारहाण अन्..., दत्तक घेतलेल्या मुलीसोबत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; संतापजनक कारण समोर

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

SCROLL FOR NEXT