Chakan Chowk
Chakan Chowk Sakal
पुणे

Chakan News : चाकणच्या रासे, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, आळंदी फाटा प्रस्तावित बाह्यवळण मार्गाला मुहूर्त मिळणार का?

हरिदास कड

चाकण - येथील मुख्य मार्गावर पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात सातत्याने वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडण्यासाठी रासेफाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी प्रस्तावित बाह्यवळणमार्ग लालफितीत अडकला आहे.

पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यासाठी येत्या ता. 24 ला मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाची बैठक आयोजित केली आहे. हा बाह्यवळण मार्ग अनेक वर्षांपासून प्रस्तावित असला तरी विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर या बाह्यवळण मार्गाच्या कामाला मुहूर्त मिळणार का? हा खरा सवाल उपस्थित होत आहे.

हा बाह्यवळण मार्ग होण्यासाठी 'पीएमआरडीए'चे अधिकारी, वाहतूक विभागाचे तत्कालीन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी संयुक्तरित्या या मार्ग जागेची पाहणी केली होती. 'पीएमआरडीए'चे क्षेत्रीय अभियंता (खेड तालुका) जितेंद्र पगार यांनी यावेळी पाहणी करून शेतकरी, संबंधित गावाचे सरपंच यांच्याशी चर्चा केली होती.

प्राथमिक पाहणी नंतर या मार्गाचे एजन्सी मार्फत सर्वेक्षण करून बाधित होणाऱ्या जमिनीचे क्षेत्र काढून शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे पोलीस विभागाच्या वतीने चाकण येथे वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी काही पर्यायी मार्ग तसेच बाह्यवळण मार्ग होण्याची गरज आहे अशा आशयाची पत्रे देण्यात आली होती.

यामध्ये तळेगाव-चाकण मार्गांवरील सारा सिटी चौक ते खराबवाडी प्रस्तावित डि.पी. रस्ता ३० मी. रुंदी, ९०० मी लांबीचा तसेच औद्योगिक वसाहतीतील सॅनी कंपनी ते नाणेकरवाडी औद्योगिक वसाहत ते पुणे नाशिक महामार्गवरील समृद्धी सीएनजी पंप (प्रस्तावित डि. पी रस्ता १५ मी रुंदी, १.१६ किमी लांबी) ह्या रस्त्याची काही लांबी ही एमआयडीसी हद्दीत असल्याने त्याचे रुंदीकरण एमआयडीसी ने करावयाचे आहे. उर्वरित लांबीचे काम पीएमआरडीए हाती घेणार आहे.

मेदनकरवाडी बंगलावस्ती चौक (पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग) ते रासे फाटा प्रस्तावित डि.पी. ३६ मीटर रुंदीचा बाह्यवळण मार्ग आहे, (लांबी दोन किमी) हा चाकण येथील वाहतुकीसाठी महत्वाचा बाह्य वळण मार्ग आहे. या बाह्यवळण मार्गासाठी एजन्सी नेमणूक करून त्यांच्यामार्फत सर्वे करून बाधित होणाऱ्या जमिनींचे क्षेत्र काढून भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

चाकणची वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी चाकणचा प्रस्तावित बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा आहे. त्याचे काम लवकर व्हावे.हा बाह्यवळण मार्ग व्हावा अशी मागणी शेतकरी कुणबी मराठा संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब कड, सरपंच अमोल साळवे, महेंद्र मेदनकर, ऍड. संकेत मेदनकर, अशोक खांडेभराड यांनी केली आहे.

या मार्गाबाबत 'सकाळ'ने बातम्या प्रसिद्ध करून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. ज्या लोकांच्या जमिनी बाह्यवळणमार्गासाठी संपादित केल्या जाणार आहे त्या शेतकऱ्यांना वाढीव एफएसआय तसेच काही शेतकऱ्यांना भूसंपादनाचा आर्थिक मोबदला देणे महत्त्वाचे आहे. हे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बहुतांश बाह्यवळण मार्ग हा मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे गावाच्या ओढ्यालगत घेतलेला आहे. या बाह्यवळण मार्गाला साधारणपणे 25 ते 30 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. या बाह्यवळण मार्गाचे काम लवकर व्हावे, चाकणची वाहतूक कोंडी सोडण्यासाठी हा महत्वाच मार्ग आहे. या मार्गाचे काम व्हावे यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिले असल्याचे ऍड. संकेत मेदनकर यांनी सांगितले.

याबाबत पीएमआरडीचे सदस्य वसंत भसे यांनी सांगितले की, पीएमआरडीए ने जो विकास आराखडा केलेला आहे तो चुकीचा आहे. त्याला काही सदस्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. बाह्यवळण मार्ग रासे, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, आळंदी फाटा हा लवकर व्हावा, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. बरेच दिवस तो लाल फितीत अडकला आहे. पीएमआरडीएच्या आयुक्तांशी शेतकरी, संबंधित गावातले काही पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाऊन हा प्रश्न कसा मार्गी लावला जाईल हे पाहिले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT