पुणे

...अन् गूढ चिठ्ठीमुळे चर्चा अचानक थांबली

CD

चाकण, ता. १९ : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीसाठी मंजूर ५९ कोटींच्या निधीचा प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत गाजला. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची घोषणा मंत्र्यांनी करताच, एका गूढ चिठ्ठीनंतर हा विषय अचानक थांबल्याने उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि तीव्र नाराजी पसरली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हा प्रकार घडला. बैठकीदरम्यान माजी उपसभापती अमोल पवार यांनी तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५९ कोटी रुपये मंजूर होऊनही संबंधित ठेकेदाराने काम केलेले नाही. रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.’’ त्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.
यावर मंत्री सामंत यांनी तत्काळ दखल घेत अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराची माहिती घेतली आणि त्याला काळ्या यादीत टाकले जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, त्याचवेळी मंत्र्यांकडे एक चिठ्ठी आली आणि त्यानंतर या विषयावरील चर्चा अचानक थांबवण्यात आली.
या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने मंजूर झालेला ५९ कोटींचा निधी त्वरित वापरून दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक, कामगार आणि उद्योजकांकडून होत आहे, तसेच वाढत्या अपघातांना जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी संतप्त मागणीही बैठकीत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT