पुणे

चाकणला स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन

CD

चाकण, ता. १६ : चाकण शहर व परिसरात स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या निर्णयाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीकडून घराघरांत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढण्याची शक्यता असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
जुने मीटर बदलून तात्काळ स्मार्ट मीटर बसवू नये, अशी नागरिकांची मागणी आहे. या मागणीबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. चाकण (ता. खेड) येथील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चाकण शहरात मागण्यांचे फलक घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याचा निषेध केला.
आंदोलनादरम्यान पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे, सहाय्यक अभियंता अविनाश सावंत यांच्याकडे मागणी मांडली. स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी. या संदर्भात नागरिकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली. जर ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुबीन काझी, माजी सभापती रूपाली जाधव, राम गोरे, संजय गोरे, अनिल देशमुख, काळुराम कड, सुरेश कांडगे, सचिन पानसरे, चंद्रकांत गोरे, शोभा शेवकरी आदी व इतर उपस्थित होते.

नागरिकांच्या शंका, तक्रारींची चौकशी केली जाईल. तसेच स्मार्ट मीटर ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली असून त्यामुळे वीज वापराचे अचूक मोजमाप होते. वीजबिल जास्त येत नाही. त्यामुळे स्मार्ट मीटर योग्य आहे. जुन्या मीटरमुळे वीजबिल वाढते. स्मार्ट मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येत नाही.
-राजेंद्र गोरे, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT