पुणे

चिमुकल्यांचा सवाल, दिल्ली मात्र गप्पगार

CD

चाकण, ता. १९ :  येथील वाहतूक कोंडीत दररोज चार-पाच तास गुदमरणाऱ्या शालेय मुलांनी थेट पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रे लिहिली आहेत. शाळेत जाण्याची उमेद हरवत चालल्याची व्यथा मांडणाऱ्या या हजारो पत्रांना साधी पोहोचपावतीही न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालक हताश झाले आहेत.
चाकणमधील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल आणि विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी हा पत्रप्रपंच केला आहे. पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यांच्या रखडलेल्या कामामुळे होणारा त्रास त्यांनी देशातील सर्व प्रमुख भाषांमध्ये लिहून पाठवला. एका विद्यार्थ्याने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली. यासोबतच, ग्रामस्थांनीही हजारो पत्रे पाठवून या गंभीर समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ‘‘विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रे पाठवली, पण संबंधित यंत्रणेकडून एकाही पत्राला उत्तर आले नाही. रस्त्याचे कामही सुरू झाले नाही. अशा परिस्थितीत आम्ही नेमकी काय अपेक्षा ठेवायची,’’ असा संतप्त सवाल उद्योजक श्याम देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या मौनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निराशेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवात स्पीकर निर्बंधांवर मंडळांचा आक्षेप! त्रास होणाऱ्यांना मंडळ पैसे द्यायला तयार, कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

Toll News: नवीन Highway वर आता 3 महिने टोल नाही? सरकारचा टेस्टिंग प्लॅन काय?

Marathi News Live Updates : टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध अटकेचे वॉरंट जारी

RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ठेवींवरील व्याजदराबाबत बँकांना भेदभाव करता येणार नाही; एक ऑक्टोबरपासून देशभरात नवे नियम लागू

Pune News : दुबईहून दिल्लीला येत असलेला तरुण पुणे विमानतळावर बेपत्ता; विमाननगर पोलिसांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT