पुणे

चाकणमध्ये टोइंग व्हॅन कारवाईला स्थगिती

CD

चाकण, ता. २० : शहरातील पी-१, पी-२ पार्किंग क्षेत्रात सुरू असलेल्या टोइंग व्हॅनच्या कारवाईला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
चाकणमध्ये स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसताना टोइंग कारवाई सुरू असल्याने कामगार, व्यापारी आणि उद्योजकांमध्ये तीव्र संताप होता. दंडात्मक कारवाई आणि संवादाच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर चाकण नगरपरिषदेचे गटनेते नितीन गोरे यांनी हा प्रश्न लावून धरला. त्यांनी स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
गोरे यांनी या समस्येबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना तातडीने फोन करून कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही स्थगिती लागू करण्यात आली आहे.

‘‘शहरात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसताना अशा प्रकारे टोइंग कारवाई करणे अन्यायकारक आहे. नागरिकांच्या हितासाठी ही स्थगिती मिळवणे आवश्यक होते.’’
नितीन गोरे, गटनेते, चाकण नगरपरिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT