पुणे

चाकणकर वाहतूक कोंडीने घायकुतीला

CD

चाकण, ता.१६ : चाकण शहरात दर गुरुवारी, रविवारी भरणाऱ्या मोठ्या बाजारामुळे माणिक चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. जुना पुणे-नाशिक मार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या रांगा अगदी पाच किलोमीटरवर लागत असल्याने प्रवाशांसह स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
चाकण शहरात पूर्वीपासून शनिवारचा आठवडे बाजार भरतो; परंतु औद्योगिक वसाहत झाल्यापासून येथे दररोजचा बाजार भरत आहे. माणिक चौकात कामगारांच्या सुट्टीनुसार दर गुरुवारी, रविवारी आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. त्यामुळे हजारोंची गर्दी मार्गावर, चौकात असते. सकाळपासूनच बाजारात येणाऱ्या ग्राहकांची गर्दी, रस्त्यांवरील हातगाडी, स्टॉल्स तसेच बेशिस्त पार्किंग यामुळे चाकणच्या प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडीचा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, या बाजारासाठी ठरावीक व प्रशस्त जागेचा अभाव असल्याने मुख्य मार्गावरच विक्रेते दाटीवाटीने बसतात. परिणामी पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते, चाकण-तळेगाव मार्ग, चाकण शिक्रापूर मार्ग, जुना पुणे नाशिक मार्ग, चाकण-आंबेठाण मार्ग औद्योगिक वसाहतीकडे जाणारे रस्ते पूर्णपणे अडवलेल्या स्थितीत असतात.. वाहतूक कोंडीमुळे अगदी एक, दोन किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तास्‌न तास लागतात. याचा फटका प्रवाशांसह स्थानिकांना बसत आहे. वाहतूक विभाग पोलिस , नगरपरिषद प्रशासन, नाणेकरवाडी ग्रामपंचायत तात्पुरती उपाययोजना करत असले तरी ती अपुरी आहे. काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त असतो; मात्र गर्दीच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याने वाहतूक नियंत्रण प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे बेशिस्त वाहनचालक, रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी व चारचाकी यामुळे कोंडीत अधिक भर पडते.

विकास आराखडाच मंजूर नाही
चाकण शहरात बाजारासाठी कायमस्वरूपी जागा नाही. त्यामुळे विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाने स्वतंत्र बाजार संकुल, मंडई, खुली जागा उपलब्ध करून दिल्यास हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. चाकण नगरपरिषदेचा विकास आराखडा मंजूर झालेला नाही तो मंजूर झाल्यानंतर भाजी मंडईसाठी जागा व इतर जागा उपलब्ध होऊ शकतात.

0008

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT