पुणे

चाकणमधील अतिक्रमणे तातडीने हटवा

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २८ : चाकण परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवा. ती हटविल्यानंतर त्याच जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी तातडीने रस्ता, सांडपाणी वाहिन्या किंवा आवश्यक पायाभूत सुविधा उभाराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण व वाहतूक व्यवस्थापन उच्चस्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये डुडी यांनी या सूचना दिल्या. यावेळी चाकण परिसरातील नागरिकांनी विविध अडचणी मांडल्या. नागरिकांच्या समस्यांवर गतीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी म्हणाले...
- चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते, वाहतूक, अतिक्रमणे, पार्किंग व सांडपाणी वाहिन्यांची कामे वेगाने पूर्ण करावीत.
- आवश्यक असल्यास २४ तास वाहतूक वळवून काम पूर्ण करून रस्ता तातडीने वाहतुकीस खुला करावा. - ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे, साइडपट्ट्या, गाळ व कचरा हटविण्याची तातडीची कामे पूर्ण करावीत. त्यासाठी कामांचा स्वतंत्र आराखडा तयार करावा.

वाहतूक व्यवस्थापनाबाबत नियोजन करावे
संबंधित विभागांनी कामाचे टप्पे आणि वाहतूक व्यवस्थापनाबाबत नियोजन करावे. पीएमआरडीए तसेच इतर विभागांची सुरू असलेली कामे परस्पर समन्वयाने पूर्ण करून वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल, याची दक्षता घ्यावी. वाहतूक कोंडीच्या ठिकाणी प्राधान्याने उपाययोजना करून रस्ते दुरुस्तीची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत. उपलब्ध पार्किंगच्या जागांचा सुस्पष्ट नकाशा तयार करून तो संबंधित उद्योग, वाहनचालक आणि वाहतूकदारांपर्यंत पोहोचवावा, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Natural Reservoir Bursts : ‘बिकट परिस्थितीतून नेपाळी सैन्याने वाचविले’; नेपाळी सैन्याच्या मदतीची नागरिकांनी केली प्रशंसा

Nasrapur Crime : सारोळा गावात थरार! पत्नीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून; आरोपी पतीला अटक

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळने नाकारली बचाव पथकांची मदत; नेपाळी सुरक्षा पथकांकडून शोध सुरूच

Truck Bike Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला! ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील-मुलीचा मृत्यू; आई गंभीर

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळमध्ये जलप्रलय! नैसर्गिक जलाशय फुटला; नेपाळ-चीन सीमेवरील भागांना पुन्हा पुराचा धोका

SCROLL FOR NEXT