chakan traffic Sakal
पुणे

Chakan Traffic : चाकणच्या वाहतुक कोंडीवर पर्याय! अवजड वाहनांना ठराविक काळाकरता केली प्रवेश बंदी

पुणे -नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकातून तळेगाव, मुंबई बाजूकडे व चाकण बाजूकडून शिक्रापूर, रांजणगाव बाजूकडे तसेच पुणे -नाशिक महामार्गाने अवजड वाहनांना येण्या-जाण्यास ठराविक काळाकरिता बंदी घालण्यात आली.

हरिदास कड

चाकण - येथील पुणे -नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकातून तळेगाव, मुंबई बाजूकडे व चाकण बाजूकडून शिक्रापूर, रांजणगाव बाजूकडे तसेच पुणे -नाशिक महामार्गाने अवजड वाहनांना येण्या-जाण्यास ठराविक काळाकरिता बंदी घालण्यात आली आहे.

चाकण तसेच इतर औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या या मार्गावरून चाकणच्या तळेगाव चौकातून शिक्रापूर तसेच तळेगाव बाजूकडे येणाऱ्या -जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता सुरळीत करण्याकरता तसेच होणाऱ्या किरकोळ व गंभीर अपघातांना प्रतिबंध करण्याकरता पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड यांच्या आदेशानुसार सकाळी आठ ते 11 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत बंदी करण्यात येत आहे.

अधिसूचना आज ता. 3 ला काढल्याने उद्यापासून सकाळी आठ ते 11 या वेळेत तसेच सायंकाळी पाच ते आठ या वेळेत या मार्गावर अवजड वाहने वाहन चालकांनी घेऊन येऊ नये असे आवाहन पिंपरी -चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेले आहे. पिंपरी- चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांनी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT