पुणे

चाकण येथील दोघांना तीन वर्षे कारावास

CD

पाईट, ता. १६ : ‘‘लग्नाला जायचे आहे कपडे जरा लवकर इस्त्री करून द्या’’ या कारणावरून झालेल्या भांडणात ग्राहकाला बेदम मारहाण करणाऱ्या चाकण येथील दोघांना तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा खेड (राजगुरुनगर) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी सुनावली आहे.
चाकण येथील तेजस वसंतराव फुलावरे, सचिन ऊर्फ पप्पू वसंतराव फुलावरे असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर आरोपीचे वडील वसंतराव फुलावरे यांची आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, ता. २० एप्रिल २०१३ ला चाकण शहरातील माणिक चौकात हार्दिक भालचंद्र पिंगळे हा वसंतराव फुलावरे यांच्या दुकानांत दुपारी बाराच्या सुमारास कपड्याला इस्त्री करण्यासाठी गेला होता. त्यावेळी हार्दिक पिंगळे यांनी वसंतराव फुलावरे यांना "मला लग्नाला जायचे आहे, कपड्यांना लवकर इस्त्री करून द्या, असे सांगितले. त्यावेळी वसंतराव फुलावरे यांच्याशी हार्दिक याचा वाद झाला. यावेळी वसंतराव फुलावरे यांची मुले तेजस फुलावरे, सचिन ऊर्फ पप्पू फुलावरे (सर्व रा. चाकण) यांनी हार्दिक यास शिवीगाळ करीत कात्रीने मारहाण केली व त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत हार्दिक पिंगळे हे जखमी झाले होते. त्यावेळी पिंगळे यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
चाकण पोलिसांनी फुलावरे यांच्या दोन्ही मुलांसह वडील वसंतराव फुलावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सुशील कदम यांनी केला होता. हा खटला न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्यासमोर सुरू होता. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील मिलिंद पांडकर यांनी ७ जणांची साक्ष घेतली. फिर्यादीतर्फे ॲड. रजनी देशपांडे यांनी काम पाहिले.
न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी तेजस वसंतराव फुलावरे, सचिन ऊर्फ पप्पू फुलावरे यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. भादवि कलम ३२४ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास, भादवि कलम ३२३,५०४,५०६ अन्वये प्रत्येकी ६ महिने साधी कैद, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा दोषींनी एकत्रित भोगवायच्या आहेत. या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस शिपाई पूजा काळे, उषा होले यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमची जोरदार मुसंडी विजया जागांचं ठोकलं शतक

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT