पुणे

चाकणमधील ''महिंद्रा लॉजिस्टिक''मध्ये वेतनवाढ करार

CD

चाकण, ता. ५ : खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात तिसरा वेतनवाढ करार नुकताच झाला. आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार कामगारांना १५ हजार ५०० रुपयांची वाढ मिळाली असून, साडेतीन वर्षांच्या या करारामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या करारानुसार कामगारांना १५ हजार ५०० रुपयांच्या वेतनवाढीसह साडेतीन वर्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. तीन रजा वाढ करून सर्व कामगार व स्टाफसाठी समान रजा धोरण लागू करण्यात आले आहे. पगाराची उचल, प्रत्येकी ५ लाख रुपयांचा ग्रुप अपघात विमा आणि मुदत विमा योजना (टर्म इन्शुरन्स) पाच लाख देण्याचे मान्य करण्यात आले आहे. करार वेळेत पूर्ण झाल्याबद्दल प्रत्येक कामगाराला ७ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान (बक्षीस) दिले जाणार आहे. याशिवाय मासिक हजेरी बक्षीस आणि बोनस रक्कम, उत्पादन वाढ आदी मान्य करण्यात आले आहे. कामगारांनी डीजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
वेतनवाढ करारावर संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार तथा आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष रघुनाथ मोरे, चिटणीस भटू पाटील, खजिनदार अमृत चौधरी, संघटक रवी भालेराव, संघटक दत्तात्रेय गवारे, प्रशांत पाडेकर, कुणाल कोळेकर, अजय टोपे, वेदांत पवार, संतोष बेंडाले, योगेश आरोडे, गोरक्ष गाडे, गणेश कापसे, चेतन आवटे यांनी तसेच व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संजय गावडे, प्रदीप झोटिंग, धीरज सिंह, निंबा भांबरे, नामदेव टाचतोडे, राहुल भागवत यांनी स्वाक्षरी केल्या. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले. कृष्णा रोहोकले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT