पुणे

चाकणमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी जागा निश्चित

CD

पिंपरी, ता. २० : चाकण औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) कचरा प्रक्रिया प्रकल्‍पासाठी पॉइंट क्रमांक ४ येथे ‘ईएसआर’जवळ ३६.५ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. यासाठी ३० वर्षांचे नियोजन करून प्रकल्‍प सुरू केला जाणार आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात चाकण, राजगुरुनगर या नगर परिषदांसह १९ स्थानिक स्वराज्य संस्थांनाही प्रकल्पाचा फायदा होईल.

चाकण परिसरात गेल्या १३ वर्षांपासून प्रलंबित घनकचरा व्यवस्थापनाचा हा निर्णय घेण्‍यात आला. ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी येथील मुख्यालयात आमदार बाबाजी काळे, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ‘एमआयडीसी’चे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी व ‘पीएमआरडीए’ आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी माहिती दिली. प्रतिव्यक्ती प्रतिदिन ३५० ग्रॅम कचरा निर्मितीचा दर गृहीत धरून प्रकल्पाचे नियोजन केले जात आहे. ग्रामपंचायतींना निश्चित ‘टिपिंग फी’ अर्थात कचरा टाकण्याच्या किंवा त्यावर प्रक्रिया करण्याच्या जागेवर कचरा उतरवून दिल्याबद्दल किंवा विल्हेवाटीसाठी प्रति टन आकारले जाणारे शुल्क द्यावे लागणार आहे.

कचऱ्याचे शंभर टक्‍के वर्गीकरण
या प्रस्तावित कचरा प्रक्रिया केंद्रापासून १९ शहरे, गावे २० किलोमीटर अंतरात आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणे तीन ते १८ किलोमीटर अंतरात आहेत. त्यामुळे कचऱ्याची वाहतूक सुलभ होणार आहे. कचरा संकलित करून त्याचे शंभर टक्के वर्गीकरण आणि तो मध्यवर्ती प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचवणे आवश्यक असेल.

कचरा वाहतुकीसाठी ‘सीएसआर’ निधीतून वाहने उपलब्ध करून घेण्याचे नियोजन आहे. काही ग्रामपंचायतींना कचरा वाहने खरेदी शक्य नाही, त्यांना प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल.
- जितेंद्र डुडी, जिल्‍हाधिकारी, पुणे

असे आहे नियोजन
चाकण परिसरात सध्‍या १७ गावांच्या परिसरात एक लाख ४९ हजार लोकसंख्‍येचा विचार करता १३५ ‘टीपीडी’ (टन प्रति दिवस) प्रकल्‍प राबविण्‍यात येईल. त्‍यानंतर वाढत्या लोकसंख्‍येचा विचार करता या प्रकल्‍पाची क्षमता वाढवली जाणार आहे. आगामी ३० वर्षांनंतर ती क्षमता २८५ ‘टीपीडी’ असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Mumbai News: कांजूरमार्गात धावत्या लोकलच्या छतावर चढला तरुण; OHE वीजपुरवठा बंद, रेल्वे सेवा विस्कळीत

Pune Civic Warning: पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य; आठ दिवसांत खड्डे बुजवा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा स्थायी समिती अध्यक्षांचा इशारा

Kondhwa Anti-Drug Action: कोंढव्यात अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; गांजा खरेदीसाठी आलेले ६१ जण ताब्यात, दोन सराईत विक्रेते अटकेत

Pune Noise Control: डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा साऊंड तपासणी उपक्रम; कर्णकर्कश ध्वनी रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

SCROLL FOR NEXT