पुणे

चाकणमधील चौकात कचऱ्याचे ढीग

CD

चाकण, ता. २१ : चाकण (ता. खेड) येथील पुणे- नाशिक महामार्गावरील माणिक चौकात कचऱ्याचे ढीग साठल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चाकण नगरपरिषद आणि नाणेकरवाडी ग्रामपंचायत यांच्यातील हद्दीच्या वादामुळे कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
माणिक चौक हा चाकणमधील अत्यंत वर्दळीचा भाग असून, येथे रहिवासी वस्ती, हॉटेल आणि मोठी बाजारपेठ आहे. चौकाच्या एका बाजूला नगरपरिषद, तर दुसऱ्या बाजूला नाणेकरवाडी ग्रामपंचायतीची हद्द लागते. दोन्ही बाजूला बसणारे भाजी विक्रेते आणि पथारीवाले मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. मात्र, हा कचरा नेमका कोणी उचलायचा, यावरून दोन्ही प्रशासनांमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. याचा फटका पादचारी आणि स्थानिक रहिवाशांना बसत आहे.
कचऱ्यासोबतच या भागात बेकायदा बाजारामुळे अतिक्रमणाची समस्याही गंभीर बनली आहे. अवजड वाहनांची सतत वर्दळ असलेल्या या मार्गावर बाजार भरत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पोलिस आणि वाहतूक विभाग बाजार हटवण्याचा प्रयत्न करतात, मात्र स्थानिक प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अतिक्रमणे वाढतच आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कचरा आणि अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

10592

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT