sangavi 
पुणे

पुणे - दापोडीतील चेंबर दुरूस्ती बाबत आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

रमेश मोरे

जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथील  तेजसिंग पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ख्रिश्चन स्मशानभूमि व कडबाकुट्टीजवळ ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने परिसरात कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सहाय्यक आरोग्य आधिकारी मनोज लोणकर यांना निवेदन येथील मानव अधिकार संस्थेच्या वतीने येथील दुरूस्ती करण्या बाबत निवेदन  देण्यात आले आहे. दापोडी रेल्वे स्टेशनच्या जागेमध्ये चेंबर तुबल्याने स्वच्छता कोणी करायची रेल्वेने की, महापालिकेच्या आरोग्य विभागाने यामुळे येथील प्रश्न गेली अनेक दिवसांपासुन बिकट होत चालला आहे. रेल्वे प्रशासन म्हणतेय आम्ही कचरा करत नाही. तर  आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यास आमची हद्द नाही असे नागरीकांना सांगितले जाते.

ड्रेनेजालाईनला योग्य उतार नसल्याने मैलामिश्रित पाणी तुंबते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. रेल्वेपटरी लगत खुली जागा असल्याने अज्ञात व्यक्ती कचरा आणून टाकतात. चार-चार दिवस येथील कचरा उचलला जात नाही. याबाबत मानव अधिकार संघाचे नरेश आनंद म्हणाले, पालिका आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन ही समस्या दुर केली पाहिजे. मात्र आरोग्य विभाग जबाबदारी टाळते आहे. आरोग्य विभागाने जबाबदारी घेवुन येथील प्रश्न सोडवावा.अशी मागणी आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Gift to Donald Trump: मोदींनी ट्रम्प यांना दिली राजस्थानची खास भेट; काय आहे गोल्डन पिचवाई चित्रकलेचं वैशिष्ट्य?

Torrent Power Project : कर्जतच्या वृक्षतोडीची भरपाई चिपळूणमध्ये? टोरांटो पॉवर कंपनीचा सह्याद्री पट्ट्यात 600 एकरचा प्लॅन? सर्वेक्षणाबाबत नेमकं काय घडलं?

Madhya Pradesh News: सिवनी व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा मोठा दणका; वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६ जणांवर कारवाई

Akole News: ‘गुरुजी द्या, आम्हाला शिकायचंय!’ शिक्षकांविना शाळा; पेंडशेतचे चिमुकले उतरले रस्त्यावर

४-४ किलोचे घुंगरू बांधून शिकली लावणी! 'ईठा'साठी श्रद्धा कपूरने घेतली प्रचंड मेहनत, 'या' लावणीसम्राज्ञीकडून घेतलं प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT