jejuri festival
jejuri festival 
पुणे

जेजुरीच्या चंपाषष्ठी उत्सवात असे भरले रंग...

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडोबा गडावर आज कुलधर्म कुलाचारासाठी राज्यभरातून भाविक आले होते. सकाळी खंडोबाचे घट उठल्यानंतर महापूजा व महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. 

चंपाषष्ठीनिमित्त जेजुरीत रविवारपासून गर्दी होण्यास सुरवात झाली होती. रविवारी रात्री गावात तेलहंडा मिरवणूक, तेलवन व हळदीचा कार्यक्रम झाला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता खंडोबाचे घट उठले. उत्सवमूर्ती भंडारगृहात ठेवण्यात आल्या. त्यानंतर महापूजा झाली. भरीत रोडगा व भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर गडावर अन्नदान सुरू करण्यात आले.

जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या सहा दिवसांपासून महाप्रसादाचे आयोजन केले गेले. आज चंपाषष्ठीनिमित्त बाजरीची भाकरी, वांगे भरीत, 
व सार- भात, असा महाप्रसादाचा आस्वाद हजारो भाविकांनी घेतला. कुलधर्म कुलाचारानंतर महाप्रसादासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. गर्दीमुळे पुजारी सेवक व ग्रामस्थांची तारांबळ उडाली होती. 

सोमवारी दिवसभर गडावर खंडोबाचे दर्शन घेणे, देव भेटविणे, तळी भरणे, अभिषेक, भंडारा उधळणे, टाक उजळणे, नवीन मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. दुपारी सर्वत्र तळी भरण्याचे कार्यक्रम सुरू असल्याचे दिसत होते. झटपट दर्शन व्हावे, यासाठी देवसंस्थाननच्यावतीने प्रयत्न केले जात होते. 

कडेपठारावरही कार्यक्रम 
खंडोबाचे मूळ स्थान असलेल्या कडेपठारावरही भाविकांनी खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तेथे दिवसभर धार्मिक विधी सुरू होते. सायंकाळी गावात तेलहंडा मिरवणूक, तेलवन व आज वांगे भरीत महाप्रसाद, असा कार्यक्रम कडेपठार मंदिरावरही आयोजित केला होता. कडेपठार मंदिरावर फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. चिंचेची बाग, कडेपठार रस्ता, पायरी मार्ग, जुनी जेजुरी या परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. 

चंपाषष्ठीचे महात्म्य 
चंपाषष्ठी हा दिवस कुलधर्म कुलाचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. "चंपाषष्ठी दिवशी अवतार दर्शी, मणिमल्ल दैत्याचा संहार करशी' याप्रमाणे मणिमल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला, असे सांगितले जाते. त्यामुळे चंपाषष्ठी हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो. कुलधर्म- कुलाचारासाठी चंपाषष्ठी व मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा मानला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT