MLA Bhimrao Tapkir sakal
पुणे

MLA Bhimrao Tapkir : चांदणी चौकात उड्डाणपुल‌परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी

खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी आज बुधवारी ही मागणी विधानसभेत केली.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - खडकवासला मतदार संघातील चांदणी चौकात उड्डाणपुल‌परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी आज विधानसभेत औचित त्याच्यामध्ये करण्यात आली.

खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी आज बुधवारी ही मागणी विधानसभेत केली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे तसेच पर्यायी सेवा रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच या उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार आहे. पुणे शहरातून जाणाऱ्या मुंबई- बेंगळुरूला जोडणाऱ्या मार्गातील चांदणी चौक हा रहदारीचा मुख्य चौक आहे.

या लगतच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही तरुण विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षण दलांतील अधिकारी घडविणारी प्रशिक्षण देणारी संस्था आहे. चांदणी चौकातील या नव्या उड्डाणपुलाचे परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत! छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा.

याकरिता पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्याची ही मागणी ही महापालिका आयुक्तांकडे मी केली आहे. अद्यापपर्यंत महापालिका आयुक्त यांनी या अतिशय महत्त्वाच्या कामासाठी निधीची तरतूद केली नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा चांदणी चौक येथे बसविण्यासाठीच्या तातडीच्या कार्यवाहीसाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तात्काळ आदेश व्हावेत. याकरिता आमदार तापकीर यांनी आज विधिमंडळात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

आजचे राशिभविष्य - 25 मार्च 2026

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

SCROLL FOR NEXT